बदली करण्यात BJP जि. प.सदस्य संजय गजपुरेचा हात नाही...


 𝚅𝚒𝚍𝚊𝚛𝚋𝚑 𝚝𝚒𝚐𝚎𝚛 𝚗𝚎𝚠𝚜 

बदली करण्यात BJP जि. प.सदस्य संजय गजपुरेचा हात नाही.......   


          कोर्धा ग्रामपंचायत या ठिकाणी कार्यरत असलेले ग्रामसेवक यांची बदली पंचायत समीती नागभिड येथे झाली . ही बदली बिजेपी चे जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे यांच्या सांगण्यावरून झालेली नसून किंवा कोणत्या अन्य कारनावरून झालेली नसून ती विनंती अर्जावरून बदली झालेली आहे. 

                   मागच्या काही दिवसापूर्वी कोर्धा येथील ग्रामसेवक यांची बदली केल्याचे श्रेय जिल्हा परिषद सदस्य स्वतः घेत असल्याचे परिसरात चर्चा होती. अशी चर्चा करणारे ,चर्चेला उधाण आणणारे आणि चर्चा घडवून आणणारे वैचारिक पातळीने कुबुद्धीचे, मंदबुधीचे आहेत असे कोर्धा येथिल बदली झालेले ग्रामसेवक यांनी आमच्या प्रतिनिधीला बोलतांना सांगितले . 

              कोर्धा येथील ग्रामसेवक यांची बदली विनंती अर्जावरुन झाली आहे.यासाठी कोर्धा येथील ग्रामसेवक यांनी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांना रीतसर विनंती अर्ज देऊन ही बदली करवून घेतली आहे.

                कोणत्याही लोकांनी बीजेपी चे जिल्हा परिषद सदस्य संजय गजपूरे यांनी कोर्धा ग्रामसेवक यांची बदली केली या खोट्या व वेडसळ प्रचाराला बळी पडू नये असे आवाहन कोर्धा ग्रामसेवक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments