तपस्या पब्लिक स्कूल,आर्वी | येथील एका शिक्षकाने केली विद्यार्थाला मारहाण | blog by avi bhagat | 358vtn
Title:- तपस्या पब्लिक स्कूल,आर्वी | येथील एका शिक्षकाने केली विद्यार्थाला मारहाण | blog by avi bhagat | 358vtn
*विदर्भ_युथ_वेलेफर_सोसायटी,अमरावती"*
द्वारा संचालित *"तपस्या पब्लिक स्कूल,आर्वी"* येथे शिक्षण घेत असणारा विद्यार्थी *नाव : सोपान प्रकाश वाघमारे' रा.तळेगाव ता.आष्टी जि. वर्धा* याला तेथे शिकवित असणारा *आरोपी शिक्षक नाव : 'किशोर राऊत'* याने मारहाण केली. *या मारहाणीत पीडित विद्यार्थ्यांचा एक कान कायमचा बधिर झाला आहे.*
पीडित विद्यार्थ्याच्या बयानानुसार.. :-त्याला मार्च -एप्रिल 2023 च्या दरम्यान एका दिवशी आरोपी शिक्षकाने शाळेत अळवून त्तुझे केस वाढले आहे ते तू का कापले नाही अशी विचारणा केली असता पीडित विद्यार्थ्याने आरोपी शिक्षक 'किशोर राऊत' याला म्हटले कि माझ्या बाबांसोबतच मी केस कापण्यासाठी जात असतो त्यांना सध्या टाइम मिळाला नाही आता मी 2-3 दिवसाने त्यांच्या सोबत जाऊन केस कापणार आहे !
त्यानंतर.. आरोपी शिक्षकाने दुसऱ्याच दिवशीपुन्हा अडवून तू केस का बर कापून नाही आला म्हणून त्याच्या कानफटावर एकदम जोरात थापाड मारली. ( विशेष बाब म्हणजे हा आरोपी शिक्षक हातात अंगठ्या आणि ब्रेसलेट /कडे घालत असे ) त्या दिवशी पीडित विद्यार्थी 'सोपान वाघमारे' हा काहीसा अस्वस्थ झाला होता. मात्र त्याने हा प्रकार त्याच्या पालकांना सांगितला नाही.
मग पुन्हा या घटनेच्या दुसऱ्या दिवशी सोपान व त्याचा मित्र वर्गात असताना पीडित विद्यार्थ्याच्या मित्राचा पेन खराब झाल्यामुळे पीडितानी त्याचे लिहून झाल्यावर त्याच्या मित्राला लिहायला पेन दिला तर त्यावरून पुन्हा *तपस्या_पब्लिक_स्कूल_आर्वी चा आरोपी शिक्षक 'किशोर राऊत' याने पीडित विद्यार्थ्याच्या त्याच कानावर जोरदार थापाड मारली.* त्यावेळेस पण त्याच्या *हाताच्या बोटांमध्ये अंगठ्या व मनगटात कडे /ब्रेसलेट होते !* त्या दिवशी मात्र पीडित विद्यार्थी अर्ध्या दिवसा पर्यंत अस्वस्थ राहिला. पण तरीही त्याने घरी आपल्या पालकांना हे सांगितले नाही. कारण - त्याला वाटत होते कि मी जर हे घरी सांगितले कि सरांनी मला मारले तर माझ्या घरचे माझ्यावरच ओरडतील कि तूच बरोबर अभ्यासात लक्ष देत नसशील आणि दुसरे कारण हे कि मी जर माझ्या पालकांना सांगेल तर माझे सर मला आणखीन मारेल या भीतीने व या मानसिक तणावामुळे पीडित विद्यार्थ्याने त्याच्या पालकांना हे सर्व घडलेलं सांगितलं नाही.
तो चुपचाप त्रास सहन करत गेला आणि मानसिक तणावात राहत गेला. पण आता काही महिन्यांनी त्याला त्याचा त्रास अनावर झाला आणि पालकांनी त्याच्यावर उपचार करायला सुरु केले असता... पीडित विद्यार्थ्याचा कान बेकामी झाल्याचे कडले व पीडिताच्या पालकांना एक मोठा धक्का बसला....!
डॉक्टरांनी विचारणा केली असता पीडित विद्यार्थ्याने संपूर्ण हकीकत सांगितली. डॉक्टरांनी तपासणी केली व 'वन इयर लॉस' असा रिपोर्ट दिला.
त्यानंतर... अपार दुःखी व संतापलेल्या पीडित विद्यार्थ्याच्या पालकानी *Tapasya_public_school_Arvi* येथे तात्काळ भेट दिली व शाळा मुख्याध्यापक यांना हे सर्व दुखमय हकीकत सांगितली आणि त्या आरोपी शिक्षकाविरोधात लेखी तक्रार दिली. पण ते *शाळेचे मुख्याध्यापक* यांनी मान्य न करता पीडित विद्यार्थी व त्याच्या पालकांसोबत साधी सहानुभूती सुद्धा दाखविली नाही. व *आरोपी शिक्षक 'किशोर राऊत'* यांच्यावर कुठलीही कार्यवाही सुद्धा केली नाही.
नाईलाजाने पीडिताच्या पालकांनी आपली तक्रार By Post आरोपीला वाचवीणाऱ्या *तपस्या_पब्लिक_स्कूल_आर्वी* ला करावी लागली पण तरी सुद्धा त्या आरोपी शिक्षकाविरुद्द शाळा प्रशासनाने कुठलीही कार्यवाही केलेली नाही.
आपल्या मुलाचे एवढे मोठे नुकसान झाले आणि हे शाळा आरोपी शिक्षकाविरुद्ध कोणतीही कार्यवाही करीत नाही आहे आणि माणुसकीच्या नात्याने काहीच सहानुभूती ना सहकार्य करीत आहे म्हणून पीडित विद्यार्थ्याच्या पालकाने अतिशय दुःखी होऊन शेवटी पोलीस स्टेशन,आर्वी कडे धाव घेतली.
आणि पोलीस प्रशासनाला सर्व हकीकत सांगून गुन्हेगार असणाऱ्या *आरोपी शिक्षक 'किशोर राऊत'* व त्याला पाठबळ देणाऱ्या शाळेच्या प्रशासनावर कडक कार्यवाही करण्यात यावी अशी फिर्याद केली आहे.
*• सदर घटना हे खुलेआम #RTE ऍक्ट चे उ्लंघन करणारी आहे.*
*• यात पीडित विद्यार्थ्याला शारीरिक व मानसिक वेदना दिलेल्या आहे.*
*• आणि यात विशेष म्हणजे त्या शाळेचे प्रशासन हे आरोपी शिक्षकाला पुरेपूर वाचविण्याचे प्रयत्न करीत असून उलट पीडित परिवारावरच बिनबुडाचे आरोप करीत आहे. ( ते सर्व गुन्हेगार असणारा करतच असतो )*
*• याचाच अर्थ असा कि या प्रकारात हे संपूर्ण*
*तपस्या_पब्लिक_स्कूल_आर्वीचे प्रशासन सहभागी आहेत कि काय ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.*
• शिस्त फक्त विद्यार्थ्यांसाठीच असते का? शिक्षकाला कुठलीच शिस्त नसते का? तो हातभार धातूच्या अंगठ्या व कडे /ब्रेसलेट घालून निरागस विद्यार्थ्यांना मारू शकतो का?
सध्या या घटनेचा तपास चालू आहे आणि सत्याच्या बाजूने चालून *#पोलीस_प्रशासन_आर्वी* हे पीडित विद्यार्थ्याला न्याय मिळवून देईल हीच अपेक्षा आहे.
आणि पुढे हे असले कृत्य कुठल्याली निरागस विद्यार्थ्यासोबत होऊ नये हीच आशा आहे.
आणि जर का पीडिताला न्याय मिळाला नाही आणि सत्याची बाजू पोलीस प्रशासनाने घेतली नाही तर.....
संपूर्ण तालुक्यातील समतावादी लोक रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही आणि त्या वेळेस जर कायदा सुव्यवस्था बिघडली तर त्याचे सर्वस्वी जबाबदार हे पोलीस प्रशासन आर्वी राहील.
*********************************
*मार्शल : अक्षय घ. भगत (आंबेडकरवादी कार्यकर्ते )*
हेही वाचा :- Independent day| blog by avi bhagat|358vtn
Comments
Post a Comment