नागपंचमीचा संबंध “नाग” या सरपटणा-या सापासी(सर्प)नसून* भारतात नाग हे “टोटेम” असणारे पाच पराक्रमी नाग-राजे


 Vidarbh tiger news| 

जय भीम नमो बुध्दाय, आज तुमच्या समोर घेऊन आलो आहे नागपंचमी चा खरा इतिहास तर वाचा सविस्तर, 

*■नागपंचमीचा संबंध “नाग” या सरपटणा-या सापासी(सर्प)नसून* भारतात नाग हे “टोटेम” असणारे पाच पराक्रमी नाग-राजे•••

*●१• अनंत (शेष) नाग*

*●२• नागराजा वासुकी*

*●३• नागराजा तक्षक*

*●४• नागराजा कर्कोटक* आणि

*●५• नागराजा ऐरावत*

ह्या पाच नागराजासी संबधित आहे

*ह्या पाच ही नाग-राजांचे स्वतंत्र गणतांत्रिक (republican) स्वरुपाची राज्ये होती.*

यामध्ये नागराजा अनंत हा सर्वात मोठा. जम्मू-काश्मीर मधील अनंतनाग हे शहर त्यांच्या स्मृतीची साक्ष पटवून देते.

त्यानंतर दुसरा नागराजा वासुकी नागराजा हा कैलास मानसरो पासून उत्तर प्रदेश क्षेत्राचा प्रमुख होता.

तिसरा नागराजा तक्षक यानेच जगप्रसिद्ध तक्षशिला विश्वविद्यापीठ स्थापन केले. येथेच प्लेटो, अँरीस्टॉटल सारखे तत्वज्ञ शिकून गेलेत.

चवथा नागराजा कर्कोटकाचे रावी नदीच्या शेजारील प्रदेशात राज्य होते.

पाचवा नागराजा ऐरावत (पिंगाला) भंडारा प्रांत आजही पिन्गालाई एरीया म्हणून ओळखला जातो.

ह्या पाच ही नागराजांच्या गणराज्याच्या सीमा ऐकमेकांच्या राज्याला लागून होत्या.

*पाच नागराजे मृत्यू पावल्या नंतर, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नागवंशीय लोक""नागराजे स्मृति अभिवादन" "नागपंचमी" म्हणून दरवर्षी साजरा करीत असत*

*वैदिक ब्राम्हणी यज्ञवंशियांच्या लेखणीने नागराजाचे रुपांतर सरपटणार्या सापात केले.*

श्रावण महिन्याच्या महतीतुन नागपंचमीला लागणारा अनिवार्य 'नाग नरसोबा'चा कागद विक्रीस आला.

 हळुहळू हा प्रयोग यशस्वी झाला तशा लहानमोठ्या पोथ्या छापील आणि घाउक स्वरुपात येऊ लागल्या.

 आर्थिक परिस्थीतीमुळे गरिब बहुजन वर्ग ह्या कागदी नाग नरसोबा ट्रेंडकडे आकर्षीत झाला कारण त्यांच्यातून पुण्य मिळते हे बहुजनांच्या मनमेंदू मध्ये बिंबविण्यात वैदिक ब्राह्मण यशस्वी झाले

त्याचाच परिणाम म्हणून 'नाग नरसोबा' आणि काही पोथ्या प्रसिद्ध झाल्या आणि नाग ही सापांची पंचमी झाली व नागलोकांची पंचमी लुप्त झाली.

आज नागाला दुध पाजणे, त्याची पूजा करणे एवढाच नागपंचमीचा अर्थ उरला. तरीपण बहुजन समाज आजही घराच्या भिंतीवर पाच नाग काढणे विसरलेला नाही.

 *हे पाच नाग म्हणजेच आपले पाच नागराजे होत.*

आज जरी नागपंचमी ही सरपटणाऱ्या नागाची म्हणून प्रसिध्द असली तरी त्याबाबतची ऐतिहासिक वस्तूस्थिती वेगळीच आढळते.

म्हणूनच बहुजनांनी धार्मिक परिघाच्या बाहेर येऊन नागपंचमी सणाच्या स्वरूपात साजरा न करता बहुजन नागराजे यांचा स्मृतिला अभिवादन करावे.🙏

______________________________________________

बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा..

पुढील व्हिडिओ पाहा ...आणि सबस्क्राईब करा vidarbh tiger news chya चॅनल ला...


_________________________________________________________

भेटूया नवीन ब्लॉग सोबत ...जय भीम नमो buddhay.

Comments