Vidarbh tiger news | wardha,
*समता सैनिक दलाच्या सैनिकांनी अन्यायग्रस्तांना दिला न्याय*
वर्धा:दिनांक १/०७/२०२१ ला शत्रुघ्न लहू कांबळे यांच्यासह कुटुंबातील दोन महिला व ४ वर्षाच्या मुलाला मारहाण करण्यात आली होती.
त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील
समता सैनिक दलाच्या सैनिकांनी लातुर जिल्ह्यात, निलंगा तालुक्यातील, केळगाव येथील अन्यायग्रस्तांना भेट दिली. त्या दरम्यान त्यांची मुलाखत घेऊन सर्व समस्या जाणून घेतल्या. बौद्ध समाजावर अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात पोलीस व उपविभागीय अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे यांना भेटून गुन्हेगारांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये प्रशासनाला गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले.
या प्रकरणातील ३ पुरुष व २ महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर दोन पुरुष आरोपी अद्याप फरार आहेत.
यावेळी तेथील पोलीस अधिकारी यांनी योग्य सहकार्य करून फरार आरोपींना तत्काळ अटक करून अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे आश्वासन दिले.
या शिष्टमंडळात समता सैनिक दलाचे वर्धा जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रदीप कांबळे,यवतमाळ जिल्हा ट्रेनिंग आँफिसर विवेक कांबळे, मार्शल पप्पू पाटील, मार्शल आकाश कांबळे,मार्शल अरहंत सहारे प्रामुख्याने उपस्थित होते.
______________________________________________
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा.धन्यवाद .
हेपण वाचा.👇👇👇👇
जाणून घ्या दुखमुक्ती चा मार्ग.
भेटूया नवीन ब्लॉग सोबत. .
Comments
Post a Comment