𝚅𝚒𝚍𝚊𝚛𝚋𝚑 𝚝𝚒𝚐𝚎𝚛 𝚗𝚎𝚠𝚜|𝙰𝚜𝚑𝚝𝚒
*अनुसूचित जातीचे मंगेश तायवाडे याला समता सैनिक दलाची आणि भीम टायगर सेनेची भेट व पाठिंबा*
आष्टी:आष्टी पोलीस ठाण्यात अंतोरा येथील अनुसूचित जातीचे मंगेश तायवाडे या युवकाला स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता राजेश श्रीराम ठाकरे यांनी पोलिसाद्वारे वापरण्यात येणाऱ्या पट्ट्याने ठाण्यात पोलिसांसमोर मारहाण करण्यात आली.तसेच त्याच्या गुप्तांगावर सुद्धा लाथीने मारहाण केली.जातीवादी मानसिकतेतून केलेले हे कृत्य अमानवीय असून निषेधार्थ आहे. पोलीस ठाण्यात पोलिसांसमोर सदर कृत्य घडल्याने जिल्यात कायद्याचे राज्य आहे की गुंडशाहीचे आहे हा प्रश्न निर्माण होतो. या घटनेचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच समता सैनिक दलाने पुढाकार घेत पीडित मंगेश तायवाडे व त्यांच्या परिवाराची भेट घेतली.तसेच आष्टी पोलिस स्टेशन येथे भेट देऊन सर्व प्रसंगाची शहानिशा करण्यात आली. कुठल्याही राजकीय पक्षांच्या दबावाला बळी न पडता पोलीस प्रशासनाने अनुसूचित जाती, जमाती अधिनियम अंतर्गत गुन्हेगारांवर फौंजदरी गुन्हे दाखल करावे.अशी मागणी समता सैनिक दलामार्फत करण्यात आली.तसेच पिडीत मंगेश तायवाडे यांचे आई,वडील,पत्नी,भाऊ यांच्याशी चर्चा करून समता सैनिक दल तुमच्या खंबीरपणे पाठिशी आहे, असे आश्वासन समता सैनिक दलाचे वर्धा जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रदीप कांबळे (रावण)यांचे मार्फत देण्यात आले.यावेळी वर्धा तालुका संघटक मनोज थूल,आर्वी तालुका संघटक प्रफुल काळपांडे, भिम टायगर सेनेचे विनोद पायले,मार्शल पप्पू पाटील,मार्शल अमोल दाभने,मार्शल प्रदीप मेंढे, मार्शल आकाश कांबळे, मार्शल अक्षय भगत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment