Vidarbh tiger news,
*उपकार भिमाचे*
बा भिमा.....
बा भिमा तुम्हा आम्ही
काळजात आमच्या बसवलंय !
अन पिढ्यानं पिढ्या रडल्या आमच्या.....
तुम्हीच आम्हा हंसवलय !!
गळ्यात असायचे मडके
झाडू कमरेला असायची !
बसलो जर चौघात तर
लाथ मारून उठवायची !!
तेव्हा कुत्र्यालाही होता मान
पण आमची सावली नाही चालायची !
मनुवादी औलादी ही
सतत आम्हाला छेडायची !!
पण साहेब..... आज
ब्राम्हण सुद्धा शिकू लागले
तुझ्या नावाचे धडे...!
आणि भले भले झूकवितात माना
तुम्ही लिहलेल्या संविधानापुढे... !!
चुकून जरी चढलों पायरी मंदिराची
तर बेदम आम्हाला मारायचे !
बोललो जर काही
विरोधात त्यांच्या... तर
जीभ ते कापायचे !!
माणसाच सोडाच... ओह...
आमचा स्पर्श....
देवाला सुद्धा विटळायचा... !
आणि एकाच्या स्पर्शाने आमच्या
अख्खा देवलोंग बाटायचा... !!
ऐकलं होत.... कि,
देव नवसाला पावतो... !
पण नवस करूनही देवाला
आम्ही चालत न्हवतो.... !!
पण साहेब......
अशा काटेरी कुंपनाला
लावली तुम्ही च आग !
आणि उचनीच तेचे झाड उपटूनी
बहरवली समतेची बाग....!!
भांडण न्हवतच कोणाशी
तरी सगळ्यांशीच आमचा वैर होता !
खुले होते दालन तरी
प्रश्न काही पाण्याचा सुटत न्हवता !!
पाण्याअभावी आयुष्यात आमच्या
अंधार सगळीकडे आला होता... !
आणि पाण्यामुळेच जीव आमचा
पाणी पाणी झाला होता... !!
पण साहेब.....
करून सत्याग्रह पाण्याचा
तुम्ही अजरामर क्रांती दावली !
म्हणतात कि.....
निसर्गनियमांप्रमाणे पाणी आग विझवते
पण बाबा.... तुमच्या स्पर्शाने तर
पाण्यालाच आग लावली....!!
बाबासाहेब तुम्हीच आमचा तिरंगा
बाबासाहेब तुम्हीच आमचे राष्ट्रगान !
तुमच्या मुळेच आहे आम्हला
भारतीय असल्याचा सार्थ अभिमान.... !!
*रचनाकार :- निखिल कैलासराव खडसे*
*मो.नंबर :- 8459167410*
*तळेगांव (शामजी पंत), रामधरा*
*तालुका आष्टी, जिल्हा वर्धा*
______________________________________________
बातम्या व जाहिराती प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा...
______________________________"_______________
Comments
Post a Comment