भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दि 15 ऑक्टोबर 1956 नागपूर दिक्षा समारंभानंतर दिलेले भाषण..
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण :
{ महार बनून राखीव जागा घ्या !}
काल एक ब्राह्मणाचा मुलगा मजकडे येऊन म्हणाला, "पार्लमेंटमध्ये तुमच्या लोकांना राखीव जागा दिल्या आहेत, त्या तुम्ही कां सोडता? "मी त्यास म्हणालो, तुम्ही महार व्हा व त्या जागा पार्लमेंट असेंब्लीमध्ये भरा. नोकरी खाली असली कि त्या जागा भारतात त्यासाठी कोना ब्राह्मणांचे, कोना इतरांचे किती अर्ज येतात !मग नोकऱ्यांच्या जागा भरतात तशा या राखीव जागा तुम्ही ब्राह्मण लोक महार बनून कां भरत नाही?
{इज्जत प्यारी, लाभ प्यारा नाही }:
आमचे नुकसान झाले तर तुम्ही कां रडता, असा माझा त्यांना सवाल आहे. खरे म्हणजे मनुष्य मात्राला, इज्जत प्यारी असते, लाभ प्यारा नसतो. सद्गुणी व सदाचारी बाईला व्यभिचारामध्ये किती फायदा असतो हे माहित असते, आमच्या मुंबईत, व्यभिचारी बायांची एक वस्ती आहे. त्या बाया सकाळी 8 ला उठल्या कि न्याहारीसाठी शेजारच्या हॉटेलात वर्दी देतात आणि म्हणतात (भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी यावेळी आवाजात फरक करून नक्कल करून सांगितले ), "सुलेमान, अरे खिम्याची प्लेट व पावरोटी घेऊन ये. "तो सुलेमान ते घेऊन येतो, शिवाय चहा, पाव केक वगैरेही आणतो. पण माझ्या दलित वर्गीय भगिनींनी साधी चटणीभाकरी देखील मिळत नाही, मात्र त्या इज्जतीने राहतात. त्या सदाचारानेच राहतात.
{पोरकटपणा सोडून प्रौढ बना }:
आम्ही झगडतो आहोत ते इज्जतीकरिता !मनुष्य मात्राला पूर्णावस्थेत नेण्याकरिता आम्ही तयारी करिता आहोत त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची आमची तयारी आहे. हे वृत्तपत्राचे लोक (त्यांच्याकडे वळून )माझ्या मागे गेली 40 वर्षे हात धुवून लागले आहेत. माझ्यावर केवढी टीका त्यांनी आजवर केली !मी त्यांना म्हणतो, अजून तरी पोरकटपणाची भाषा सोडून काही प्रौढ भाषा वापरा.
{हक्क पुनः मिळवूच !}:
आम्ही बौद्ध धर्मियझालो तरी राजकीय हक्क मी मिळवीन याची मला बालंबाल खात्री आहे. (परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष व प्रचंड टाळ्या )मी मेल्यावर काय होईल हे सांगता येणार नाही. या चळवळीसाठी फार मोठे काम करावे लागेल. आम्ही बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे काय होईल, अडचणी आल्याच तर कशा टाळता येतील, त्यासाठी काय युक्तिवाद व खटाटोप करावा लागेल, याचा मी पूर्ण विचार केला आहे. माझ्या पोतडीत सर्व काही भरलेले आहे. ते काय प्रकाराने भरलेले आहे ते पूर्ण माहित आहे. हे जे हक्क मिळविले ते मीच माझ्या लोकांच्यासाठी मिळविले. ज्याने हे हक्क मिळविले ते तो पुन्हा मिळवून देईलच !हे हक्क व सवलती देणारा मीच आहे, आणि मी पुन्हा या सवलती मिळवून देईल, अशी मला खात्री आहे. म्हणून सध्या तरी तुम्ही माझ्या वर विश्वास ठेवून चालले पाहिजे. विरोधी प्रचारात काही तथ्यनाही हे मी सिद्ध करून देईन...
उर्वरीत भाग उद्या ...
(हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर दिक्षा समारंभानंतर दिलेले भाषण आहे.... हे भाषण धम्मचक्र प्रवर्तन ते अनुवर्तन या पुस्तकातून लिहिण्यात आला आहे....
जय भीम नमो बुध्दाय जय विदर्भ...



Comments
Post a Comment