सर्व प्रथम मी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. आणि सगळ्यांना जय भिम करतो..
संविधान हे 26 नोव्हेंबर 1949 रोजी प्रकाशित करण्यात आले होते. हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे भारताचा संविधान लिहिण्याची जबाबदारी होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार सुद्धा म्हटल्या जाते.
संविधानामध्ये आपले मूलभूत अधिकार लिहिले आहे . हे सगळ्या तरुणपिढी ला माहिती होणं खुप महत्वाचे आहे.
संविधानामुळे आपला भारत देश सुरक्षित आहे. जर संविधान नसतं तर आपला भारत देशात जातीभेद राहिला असता. आता संविधान आहे म्हणून आपला भारत देश सुरळीत काम करत आहे. आणि आता जातीभेद राहिलेलं नाही.
जर का संविधान हा ग्रंथ शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये शिकवला तर आपली येणारी जे तरुणपिढी आहे. ते त्यांना आपले मूलभूत हक्क कोणते आहे . देशात कस वागायचं व कोणी मारलं, कोणी मर्डर केला, यांना कोणती शिक्षा असते. व कोणती कलम लागते. हे येणाऱ्या तरुणपिढीला कळते.
शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये संविधानाचे एक एक कलम शिकवणे हे खुप महत्वाचे आहे. जेणेकरून येणाऱ्या तरुणपिढी ला संविधानाचे ज्ञान होईल.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस संविधान लिहायला लागला होता.
माझी सरकारला विनंती आहे शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये संविधान शिकवले पाहिजे.
टीव्ही चॅनल वाल्यांना पण नम्र विनंती आहे तुम्ही रामायण, महाभारत दाखवतात. एकदा तरी संविधान वर आधारित मालिका बनवा जेणेकरून सगळ्या भारतवासी यांना संविधानाविषयी माहिती होईल
--अविनाश घ. भगत (मुख्य संपादक vidarbh tiger news )....
*************************************************
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या व्हाट्सअँप नंबर वर संपर्क करा ..
************************************************ja
जय भिम नमो बुध्दाय जय संविधान जय विदर्भ..
*************************************************
👌👌
ReplyDeleteThanks 😊
Delete