दि. 15 नोव्हेंबर 1956 काठमांडू जागतिक बौद्ध धम्म परिषदेत दिलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण भाग 17


               जागतिक बौद्ध धर्मीय परिषदेच्या चौथ्या सभेमध्ये जगातील चौतीस राष्ट्रांनी भाग घेतला असून, त्यात प्रामुख्याने बर्मा, कॅनडा, सिलोन, चायना, झेकोस्लोव्हीकिया, ईस्थोनिया, फार्मोसा, फ्रांस, जर्मनी, हॉंगकॉंग, हंगेरी, भारत, इंडोनेशिया, इटाली, जपान, कोरिया, लडाख, लाटव्हिया, लाओस, मलाया, नेपाळ, पाकिस्तान, पेनांश, फिलिपाइन्स, स्वीडन, सिक्कीम, सिंगापूर, थायलंड, तिबेट, युनायटेड किंगडम, यु. एस. ए. यु. एस. एस. आर. त्या त्या देशातील प्रतिनिधी खास निमंत्रणाने बोलाविलेले पाहुणे, बुद्ध भिक्खू, बुद्ध भिक्खुणी, ऑबझव्हर्स इत्यादी मिळून 400 निमंत्रित परदेशीय प्रतिनिधी काठमांडूतील सभेच्या ठिकाणी उपस्थित होते. काठमांडूतील भव्य अशा तुडखेल ग्राउंडवर हा जागतिक चौथ्या बौद्ध धर्मीय परिषदेचा मेळावा भरला होता. हे तुडखेल ग्राउंड मिलिटरीच्या कवाइतीसाठी  नेपाळ सरकार वापरीत होते. या परिषदेची सुरुवात दुपारी बारा वाजता होणार असल्याने परदेशीं पाहुणे ज्या ज्या ठिकाणी उतरले होते तेथे तेथे त्यांना सकाळीच 10 ||वा. जेवण देण्यात आले. जेवणानंतर सर्व परदेशी पाहुण्यांना खास मोटारीने सभेच्या स्थानी आणण्यात आले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आज भारतीय पद्धतीचा पोशाख केला होता. उलनची पॅन्ट आणि गळ्यापर्यंत बटण असलेला भारतीय पद्धतीचा त्याच रंगाचा कोट घातला होता आणि डोक्यावर बफ रंगाची नक्षीदार टोपी घातली होती. माईसाहेब आंबेडकरांनी रेशमी पातळ परिधान केलेले होते आणि त्यावर बफ रंगाचे उलनचे स्वेटर घातले होते. नेहमीप्रमाणे त्यांनी कपाळावर कुंकुम तिलक लावला होता. सभेला सुरुवात होण्यापूर्वीच परदेशी पाहुणे आपापल्या जागी जाऊन बसले होते....... 

              जगातील चौतीस राष्ट्रातून 200 बुद्ध भिक्खू आणि 50 बुद्ध भिक्खुणी या जागतिक मेळाव्यास उपस्थित होत्या. सभेच्या मध्यभागी 25 फूट उंचीचा सुशोभित असा मंडप घालण्यात आला होता. मंडपाच्या पुढील बाजूला धनुष्यकृती बाल्कनी काढली होती व तिच्या मधील त्रिज्या सहा फुटाची होती. बाल्कनीची उंची आठ फूट होती आणि त्यावर मध्यभागी भगवान गौतम बुद्धाची दोन फूट उंचीची सुवर्ण मूर्ती ठेवली होती. मूर्तीच्या पाठीमागे जाळीची नक्षी होती. ती मुख्य पुतळ्यापासून सहा इंचापर्यंत वर होती. बुद्धांचे आसन कमळाच्या फुलावर घातले असून, त्यावर उत्कृष्ट नक्षी काम केलेले होते. मूर्तीची मांडणी चौकोणीसारख्या पाटासारखी होती व तिच्यापुढील दोन कोपऱ्यावर दोन बुद्ध भिक्खू हात पुढे केलेले आहेत . 

              बौद्धर्मीय लोकांची चौथी जागतिक परिषद यशस्वी होवो अशी सदिच्छा व्यक्त करणाऱ्या तीस देशांनी आणि संस्थांनी आपापले संदेश पाठविले होते. हे संदेश वाचून  झाल्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले... 

                       ***************                              

अश्या अनेक बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या व्हाट्सअँप नंबर मला संपर्क करा.. 

****************************************

         जय भीम नमो बुध्दाय जय विदर्भ                      

###$#****


Comments