दि. 15 नोव्हेंबर 1956 काठमांडू जागतिक बौद्ध धम्म परिषदेत दिलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण भाग 18


 परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण :

आपल्या भाषणात परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. म्हणाले, 

परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण :

             मी माझ्या देशातून किंवा संस्थेकडून तुम्हाला संदेश घेऊन आलो नाही. या देशामध्ये (नेपाळात )बुद्धाचा जन्म झाला परंतु 2500 वर्षानंतर बुद्धधर्म येथून नाहीसा झाला आहे. बुद्धधर्माचा वृक्ष अद्याप आहे, त्याचा पाला सुकलेला आहे. परंतु त्याचे मूळ सुकलेले नाही. त्याला पाणी घातले तर तो वृक्ष वाढेल अशी माझी खात्री आहे. म्हणून मी येथे संदेश आणला नाही. मी तुम्हाला संदेश आणला नाही परंतु मी बौद्धधर्म का स्वीकारला हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. मी बौद्धधर्म का स्वीकारला !कारण त्यात समता, बंधुभाव आणि स्वातंत्र्य आहे. इतर धर्मामध्ये ईश्वर आणि आत्मा यांचे शिवाय दुसरे काही नाही. मनुष्य मात्राला उन्नतीला ही जी तीन करणे आहेत त्यांचा इतर धर्मामध्ये समावेश केलेला नाही. 

अष्टांगिक मार्ग हा पाया आहे :

            बुद्ध धर्म स्वीकारण्याचे दुसरे कारण सांगतात, परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले कि, " बुद्धधर्माचे अधिष्ठान, जगात दुःख आहे ह्या तत्वावर बसविलेले आहे, ईश्वर व आत्मा यांचेवर बसविलेले नाही. माणसे जगामध्ये दुःखी आहेत ह्या तत्वावर बसविलेले आहे. इतकेच नव्हे तर त्या दुःखाचे निवारण करणे व ते निवारण्याचा मार्ग दाखविणे हे धर्माचे अंतिम ध्येय आहे, असे भगवंताने सांगितले आहे. जो धर्म या कसाला (कसोटीला ) उतरणार नाही त्याला धर्म म्हणता येणार नाही, असे भगवंताने आपल्या पहिल्या सूत्रामध्ये -धर्मचक्र प्रवर्तनामध्ये सांगितले आहे. असे कोणत्याच धर्मसंस्थापकाने सांगितले नाही. या कारणामुळे मी बुद्धधर्म स्वीकारला आहे. दुःख निवारण्याकरिता प्रज्ञा, पारमिता बुद्धाने सांगितली आहे. "

******************************************

चल उठ पटकन जागा हो.................................. 

    संघर्षाचा धागा हो........ 

***********************************************************************************

भरले असते माझे घर 100 च्या नोटाने तर मेला असता माझा समाज उपाशी पोटाने....... 

******************************************

    बातम्या प्रकशित करण्यासाठी 9561750423 या व्हाट्सअँप नंबर वर संपर्क करा 

*******-***********************************

जय भीम नमो बुध्दाय जय विदर्भ. 

*****************************************

Comments