आर्वी येथे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले(arvi news)


 Vidarbh tiger news,

       Arvi /wardha,


आज दि.२८ नोव्हेंबर २०२० रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार ,विश्वरत्न प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर १२९ वी. जयंती उत्सव समिती आर्वीच्या वतीने क्रांतिसूर्य, शिक्षणाचे जनक, सत्यशोधक, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या स्मुर्ति दिना निमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती आर्वी येथे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

 या प्रसंगी भारतीय घटनेचे शिल्पकार ,विश्वरत्न प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर १२९ वी. जयंती उत्सव समिती आर्वी अध्यक्ष आयु. राजाराम डोंगरे, दर्पण टोकसे - सचिव , अमर मेहरे, सौरभ अ.टोकसे, कृषी उत्पन्न बाजार समिती आर्वी चे आयु. विनोद भाऊ कोटेवार, आयु. ओम भाऊ सोनोने प्रबुद्ध बुध्द विहार ट्रस्ट आर्वी चे सचिव अजय वाघमारे, ऑल इंडिया समता सैनिक दल शाखा आर्वी चे आयु. प्रमोद भाऊ चौरपगार, आयु. विनेश भाऊ तागडे, आयु. अनिलभाऊ माहुरे, आयु. सचिनभाऊ शिंदे, आयु. अभिषेक भीवगडे यांच्या उपस्थितीत पार पडला.

 तसेच सर्व पदाधिकारी, व्यापारी, कार्यकर्ते, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते...

*******************************************

अशा अनेक बातम्या प्रकाशित करण्यासाठी ९५६१७५०४२३ या नंबर वर संपर्क साधावा.

Comments