Velentine Day Special.
आम्ही लेणीप्रेमी
आम्ही आंबेडकरवादी संघटनेच्या आणि बोधिसत्व यांच्या संयुक्त विद्यमाने १४-०२-२१ म्हणजे velenetine डे निम्मिताने आम्ही लेणीप्रेमी हा संकल्प ध्यानीमणी ठेवून पहिली कार्यशाळा सुधागड पाली येथील नेणावली/खडसांबळे या प्राचिन बुद्धलेणीवर पार पडली. या कार्यशाळेत मोठ्या संख्येने युवा वर्गाने मोठया प्रमाणात सहभाग घेत मुंबई ते खडसांबळे सुधागड पाली येथील प्रवास Bike Rally च्या स्वरूपात केला. खडसांबळे गावापासून प्राचीन बुद्धलेणी पर्यंत खडतर प्रवास या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या भगिनींनी सुद्धा केला. लेणीपर्यंत चा प्रवास झाल्यावर सर्व युकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता कारण त्यांनी एवढ्या लांब चा प्रवास करून पाहिल्याच आपल्या दैबित्यमान वारसा आणि आपला गौरवशाली इतिहास त्यांनी पाहिला. या कार्यशाळेत अनेक विषयांवर भर टाकण्यात आले.
१. जास्तीत जास्त प्राचिन बुद्धलेण्यांना भेटी देण.
२. या प्राचिन लेण्यापर्यंत येण्यासाठी सुधागड पासून खडसांबळे गावापर्यंत होर्डिंग लावणे.
३. या लेण्यांपर्यंत गावापासून पोहचण्यासाठी सूचनाफलक लावणे या बाबत नियोजन.
४. पुरातत्व विभागाला पत्रव्यवहार करून लेण्याचे डागडुचीचे काम करून घेणे.
वरील विषय घेऊन आम्ही आंबेडकरवादी या संघटनेच्या माध्यमातून वरील विषयवार जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न झाला. या कार्यशाळेबआयु. आशिष जाधव सर, आयु. अविरत गायकवाड सर तसेच आयु. संदीप कदम सर तसेच सर्व कार्यकारणी सभासद यांनी आपले विचार मांडले. आपला गौरवशाली वारसा पाहून सर्वांचे मन भरून आले होते आणि सर्वानी हा निश्चय केला कि आता बस झाले या लेण्याच्या संवर्धन कार्यासाठी आपण पुढे येऊन या चळवळ करू आणि सर्वाना या मध्ये सहभागी करून घेऊ हा देखील निश्चय करण्यात आला.
विशेष आभार: आयु. समाधान सोनावणे सर, आयु. मकरंद लंकेश्वर सर
#बोधिसत्व
Bodhi Satva
आम्ही आंबेडकरवादी ✍️
Bodhi satv youtube channel report.
______________________________________________
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क साधावा ..
______________________________________________
Comments
Post a Comment