Vidarbh tiger news,
कविता
...मोठा अधिकारी होईन...
माया मायच जीवन म्हणजे जशी धुयाने बुजलेली पांदण... जग मंगळावर गेल तरी तिचे हाताने विळ्याचेच निंदण...
शिळी भाकर गोड लागे तिले अपार कष्ट केल्यावर... आभाय कमी पडे तिले जवा तिची पात जाये धुन्यावर...
भर दिवायीच्या दिवशी उलीश्या तेलात सारे पेटवे ती दिवे... तिच्या फाटक्या पदरात आमचे सारे सुख दुख: मावे.
नाही थांबवल जीवन तिन कधी माया बापाच्या मरण्यानं... तास कधी बेरलं नाही तिच्या हातच्या पेरण्यानं...
सोन्यावानी मुखोटा तिचा पण काये मनीच तिच्या गयात... आसू डोयातून निघे तिच्या जवा काटा खुडे पायात...
कष्ट तुये अपार माय त्याले किंमत सोन्याची येईन... तुया पाणावल्या डोयाच्या देखत मी मोठा अधिकारी होईन...
-प्रा. दर्शनकुमार चांभारे, रा. माटोडा, ता. आर्वी, जि. वर्धा मो. ९३७३०९२३४०
______________________________________________
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा.
______________________________________________
Comments
Post a Comment