Vidarbh tiger news,
कविता
आर्वी देऊरवाडा रस्ता...
रोडात खड्डे की खड्ड्यात रोड, आमच्या रोडचे काय हाल पुसता... खड्ड्यामुळे जिल्ह्यात गाजला, आमचा आर्वी-देऊरवाडा रस्ता...
सांधेदुखी, कमरदुखी ने, जनता सारी त्रस्त आहे... रोडच्या सुर्योदयाची वाट पाहून, इथे रोजच सुर्यास्त आहे...
आर्वी-देऊरवाडा रस्त्यावरून, चालून गाड्यांचे हाल बेहाल झाले... गुळगुळीत रोड पाहून, आज कित्येक साल झाले...
तुम्ही करा राजकारण पण, साहेब जनतेकडे थोड लक्ष ठेवा.. होऊ द्या काम चालू रोडच, बाजूला तुमचे सारे पक्ष ठेवा..
कित्येक झाले उद्घाटन पण, काम काही अजून चालू झाल नाही... मंत्री आले,जंत्री आले पण, प्रत्यक्षात कुणीच काही केल नाही...
श्रेय पण तुम्हीच घ्या वरुन देतो, वाटल्यास फुलाचा गुलदस्ता... अपघाताची वाट पाहू नका, लवकर करा आर्वी-देऊरवाडा रस्ता...
-दर्शनकुमार चांभारे, मो. ९३७३०९२३४०
रा. आर्वी
______________________________________________
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा.
______________________________________________
Ads published करण्यासाठी, google form fill करा.
Google form|👈👈👈👈👈
______________________________________________
Like ,and follow my fb page,
Facebook👈👈👈👈👈👈👈👈
Twitter👈👈👈👈👈👈👈👈👈
______________________________________________
Subscribe to youtube channel,
YouTube👈👈👈👈👈👈👈👈👈
_______________________________________________
Comments
Post a Comment