Stop smoking |तंबाखू मुक्त गाव|खरीच झाले का?


 Vidarbh tiger news,

        जय भीम नमो बुध्दाय, सगळ्यांना आज आपण वाचणार आहोत. कि खरीच गाव तंबाकू मुक्त झाले आहे का? हे तंबाकू मुक्त गाव च बोर्ड लावून काय फायदा झाला? 

           आज मला गावात तंबाकू मुक्त क्षेत्र म्हणून एक बोर्ड दिसलें. मि एक दम चकित झालो, कि आपलं गाव कधीपासून तंबाकू मुक्त क्षेत्र झालं. 

            तंबाकू मुक्त क्षेत्र जर झालं असतं त दुकानातून सीग्रेड, बिडी, तंबाखूच्या पुड्या गायब झाल्या असत्या, पण असं काही झालं नाही. 

             मग गाव तंबाखू मुक्त क्षेत्र घोषित करून काय फायदा आहे. 

            खरीच जर तंबाखू, खर्रा, दारू, गुटखा, अन्य नशेली पदार्थ  झाले तर गावची प्रगती होईल, हे नक्की आहे. 

             पण यात जर राजकारण असेल त काही खरं नाही, तर उलट गाव डुबेल हे नक्की आहे. 

             म्हणून तंबाखू मुक्त क्षेत्र या नावाचा बोर्ड लावण्यापेक्षा कृतीत करून दाखविणे महत्वाचे असते. 

             आज हि गावात दारू मुक्त गाव, तंटामुक्ती गाव, तंबाखू मुक्त गाव असे अनेक बोर्ड लावले आहे. पण काही फायदा नाही. 

              कारण दारू विकणे, तंटा करणे, तंबाखू, सीग्रेड, बिडी चे सेवन करणे चालू आहे,. 

              या गोष्टींचा कारणीभूत आपण लोक आहे. जो पर्यंत तुम्ही हे गुटखा, दारू, बंद करत नाही. तो पर्यंत आपल्या गावाचं भविष्य, आणि तुमच्या  मुलांचं भविष्य पाण्यात आहे.. 

    एवढे लिहून माझे दोन  वाक्यात माझा लेख संपवितो. 

जय भिम नमो बुध्दाय. 

                                   तुमच्या सारखा एक नागरिक. 

------------------=-===-==-----=-------------------------------

बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या नंबर वर संपर्क करा. 

--------------------special ads------------------------------


Powerd  by  vidharbh tiger news ads agency...

Comments