तू प्रचारक हो मानवतेचा bhimjayanti special


 Vidarbh tiger news,

तु प्रचारक हो मानवतेचा


ते निघालेत धर्माच्या नावाने माणसांचे मुडदे पाडायला

तू मात्र निघ मानव सेवेसाठी महाकरुणावान बुद्धांच्या असिम मैत्रीचा धागा घेऊन 


ते माणसा-माणसात उभ्या करताहेत भिंती 

धर्मद्वेषाचे विष पाजूनि का? विसरतोय माणूस माणुसकी 


ते पेरतायेत विषमतेचे बीज या मातीत

पण तू समतादूत होऊनी पेरणी कर बंधूभावाची

आणि नष्ट कर तण! वैमनस्य द्वेषाचे


सर्वत्र धर्मद्वेषाच्या अग्नीने पेटत असताना शहरे

तू घेऊन जा शीतल झरा मानवतेचा


ते निघालेय राष्ट्र करण्या धर्मनिष्ठ

पण तु अखंड बलशाली भारत ठेवण्या सज्ज हो.


✒️सुरेश किसनराव भीवगडे आर्वी ( जि वर्धा ) 

______________________________________________

बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9531750423 या क्रमांकावर संपर्क करा.

_____________________________________________



Comments