कोलगाव अतिक्रमण धारकांची पर्यायी व्यवस्था करा* *-समता सैनिक दल महिला विभागाची मागणी*


 Vidarbh tiger news | wardha. 

*कोलगाव अतिक्रमण धारकांची पर्यायी व्यवस्था करा*

  *-समता सैनिक दल महिला विभागाची मागणी*

  *-मा.जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.वर्धा यांना निवेदन सादर* 

वर्धा:सेलू तालुक्यातील मौजा कोलगाव वार्ड नंबर १ मधील अतिक्रमणग्रस्त, बेघर आदिवासी नागरिकांची पर्यायी व्यवस्था करून देण्याबाबतची मागणी समता सैनिक दल महिला विभागाच्या वतीने मा.जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

        सेलू तालुक्यातील खापरी(सी.)ग्रा.प.अंतर्गत येणाऱ्या कोलगाव वार्ड क्र.१ मध्ये अतिक्रमण करून राहणाऱ्या नागरिकांचे अतिक्रमण दिनांक १०/१२/२०२१ रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता पाडून त्यांना बेघर करण्यात आले आहे तेव्हापासून ते नागरिक आपला उघड्यावर संसार करीत आहेत. त्यात लहान बालके आणि व्रुद्ध नागरिक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

   मागील ग्रा.प.मध्ये झालेल्या विशेष सभेमध्ये त्या विषयावर चर्चा करण्यात आली होती. त्यात ग्रा.प.सदस्य रामचंद्र भलावी यांनी या अतिक्रमण धारकांना राहण्यासाठी ३ ते ४ जागा दर्शविल्या होत्या मात्र सरपंचाचे हेकेखोरपणामुळे आणि मनमानी कारभारामुळे बेघर नागरिकांना न्याय मिळू शकला नाही.त्यामुळे त्या विरोधात ४ ग्रामपंचायत सदस्यांनी प्रोसिडिंग बुकमध्ये सह्या केल्या असल्याचे समजते. हे अतिक्रमणधारक नागरिक २०१७ पासून या ठिकाणी कच्ची घरे बांधून राहत होते. त्यांची कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात न आल्यामुळे उन्हाच्या तडाख्यात त्यांना खुल्या जागेवर रहावे लागत आहे.

     आपण ही बाब गंभीरतेने घ्यावी आणि या निवेदणावर त्वरीत कार्यवाही करुन सरपंच ग्रा.प.खापरी(सी.)त-सेलू जि-वर्धा येथील नागरिकांना त्वरीत पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी आदेश द्यावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

       यावेळी निवेदन देतांना सानेवाडी शाखा संघटिका सुमनताई बागडे, झोपडपट्टी संघर्ष समिती तसेच सिंदी (मेघे)रमाई नगर शाखा संघटिका वंदनाताई वासनिक, मार्शल रत्नमाला रामटेके,मार्शल प्रिती आष्टेकर, मार्शल सुनिता गायकवाड,डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकार संघाचे सचिव, पत्रकार प्रदीप भगत,समता सैनिक दल जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रदीप कांबळे,मार्शल अमोल ताकसांडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

______________________________________________


                               Subscribe


Comments