**कोरोना**
*प्रशासनाच्या वागण्यावर*
*जनतेचा कल झालाय...!*
*सावध राहा, काळजी घ्या*
*देशात आपल्या कोरोना आलाय..!!*
*कोरोना आहे संसर्गजन्य रोग*
*तो स्पर्शा -स्पर्शाने पसरतोय..!*
*आता मात्र बरे होण्याचा*
*आकडा मात्र घसरतोय...!!*
*राहीले असेच दिवस जर*
*महापूर अश्रुंचा येतील..!!*
*कोरोनाने नाही साहेब*
*माणसं भुकमारीनेच मरतील..!!*
*गंगेच्या पात्रात गर्दीच गर्दी,*
*मृतदेहांची दाटली होती.!*
*कळले असेल का त्यांना आधीच*
*ज्यांनी गंगा मैलीच म्हंटली होती..!!*
*आरोग्याचे बंधन रुग्णांसाठी*
*संजीवनी रुपी काढा,.!*
*वापर करा मास्क, सॅनिटायजरचा,*
*आणि शक्यतो गर्दीत जाणे टाळा.. !!*
*शेवट नियम सर्व आपल्यासाठी*
*लक्षात आपल्या असुद्या..!*
*आणि कुटुंबावरच प्रेम तुमचं*
*घरात राहूनच दिसू द्या...!!*
*:-निखिल कैलासराव खडसे*
*तळेगांव (शामजी पंत), रामधरा*
*तालुका आष्टी, जिल्हा वर्धा*
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा..
कोरोना एक जागतिक लुटमारी 👇👇👇
Comments
Post a Comment