पेट्रोल, डिझेल व गँसच्या दरवाढीला कंटाळून समता सैनिक दल संरक्षण विभाग प्रमुख प्रदीप कांबळे यांनी पेटविली स्वतःची दुचाकी*
Vidarbh tiger news| wardha प्रतिनिधी.
पेट्रोल, डिझेल व गँसच्या दरवाढीला कंटाळून समता सैनिक दल संरक्षण विभाग प्रमुख प्रदीप कांबळे यांनी पेटविली स्वतःची दुचाकी*
- *निदर्शने करून केला प्रशासनाच्या धोरणाचा निषेध*
वर्धा:पेट्रोल,डिझेल व गँसच्या दरवाढीला कंटाळून समता सैनिक दल सुरक्षा विभाग प्रमुख यांनी समता नगर येथील मैदानात स्वतः ची दुचाकी पेटवून केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देऊन निदर्शने करण्यात आले.
एकीकडे कोरोना संक्रमण काळात लाँकडाऊनमुळे लोकांचे रोजगार संपले असून हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल व गँसचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.दररोज होणाऱ्या या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक कोंडी होत आहे.कोरोनाच्या संकटात सर्व कामे धंदे ठप्प झाले असताना सर्व सामान्यांना दिलासा मिळणे आवश्यक होते. मात्र केंद्र सरकारच्या धोरणामुळे राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील गरीब, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी वर्गात असंतोष निर्माण झाला आहे.तसेच संपूर्ण देशात पेट्रोल व डिझेलचे सर्वाधिक दर महाराष्ट्रात लागू आहेत. या दरवाढीमुळे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वसामान्यांची सर्रास लुट सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.केंद्र व महाराष्ट्र शासनाने पेट्रोल,डिझेल व गँसवर केलेली दरवाढ तात्काळ कमी करावी या मागणी करीता समता सैनिक दल संरक्षण विभाग प्रमुख प्रदीप कांबळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांची स्वतःची दुचाकी पेटवून निदर्शने करण्यात आले.
यावेळी समता सैनिक दल जिल्हा संघटक अभय कुंभारे, जिल्हा संरक्षण विभाग प्रमुख प्रदीप कांबळे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकार संघाचे सचिव प्रदीप भगत,मार्शल अमोल ताकसांडे,मार्शल स्वप्निल ताकसांडे, मार्शल चंदु भगत, मार्शल रोशन कांबळे, मार्शल पप्पू पाटील, मार्शल विक्की वागदे,मार्शल ज्योती ताकसांडे,मार्शल अतुल कांबळे,मार्शल सीमा वाघमारे, मार्शल लक्ष्मी ताकसांडे मार्शल सम्यक ताकसांडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Watch this news video.👇
____________________________________________
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा...(जय भीम नमो बुद्धाय )
Comments
Post a Comment