Vidarbh tiger news | Arvi wardha,
*धम्मसावली बुद्ध विहार हैबतपूर पुनर्वसन येथे वर्षावास प्रबोधन व आंबेडकरी कविसंमेलन संपन्न*
निळाई सामाजिक सांस्कृतिक परिवार नागपूर व धम्मसावली बुद्धविहार व बोधीसत्व वाचनालय हैबतपुर पुनर्वसन तह. आर्वी च्या वतीने आंबेडकरी आंदोलनाची कविता काव्यधारा व वर्षावास प्रबोधन आयोजित करण्यात आले होते.
स्थळ= धम्मसावली बुद्धविहार बोधीसत्व वाचनालय
हैबतपुर पुनर्वसन ता. आर्वी
दिनांक= रविवार २५/०७/२०२१
संध्याकाळी कवीसंमेलन आयोजीत.
अध्यक्ष= छत्रपाल तामगाडगे
सुत्रसंचलन= प्रवीण कांबळे
♦️कवी.रंगराज गोस्वामी
♦️कवी.सुरेश भिवगडे
♦️कवी.संजय पाटील
♦️ कवी.सचिन मनवरे
♦️ माणिक खोब्रागडे
♦️प्रा राजेन्द्र कांबळे व कविता सादर केल्या.
भगत ताई यांनी रमाई गीत सादर केले . प्रमूख अतिथी दर्पण टोकसे सूरज मेहरे
मधुकर सवाळे , नारायण पाटील आदी प्रमूख अतिथी होतें
या कविसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन निळाई त्रैमासिकाचे संपादक प्रा. प्रविण कांबळे यांनी केले. याप्रसंगी निळाई परिवाराचे वतीने बोधीसत्व वाचनालय येथे ग्रंथसंच दान देण्यात आला.
या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सुरेश भिवगडे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी हैबतपूर पुनर्वसन उपासक उपासीका व बोधीसत्व वाचनालय येथील विद्यार्थी मित्रांनी सहयोग दिला. येथिल यांनी सहकार्य केले.
____________________________________________
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क साधा..
Comments
Post a Comment