संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालय, भिडी येथे काव्य संवाद संपन्न


Vidarbh tiger news | deoli wardha,

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालय, भिडी ता. देवळी जि. वर्धा व पथदर्शक परिवाराच्या सहयोगाने आयोजित ऑनलाईन काव्यसंवाद संजय ओरके सर यांच्या अध्यक्षतेखाली व जगदीश भगत (निवेदक, रेडिओ वर्धा) यांच्या बहारदार संचालनाने परिवर्तन वादी एकापेक्षा एक दमदार रचना सादर करून संपन्न झाले.. संत गाडगेबाबा वाचनालयाचे मुख्य संयोजक अरुणकुमार हर्षबोधी सरांच्या विशेष प्रयत्नातून हे कविसंमेलन आयोजित करण्यात आले.. वाचनालयाच्या सुसज्ज इमारतीत रंगलेल्या या ऑनलाईन काव्य संवादात प्रकाश जिंदे, प्रकाश ढाले, सोपान दातार, श्रीराम मेंढे, घनश्याम थूल, मानवटकर सर, किरण उपाध्ये, सुरेश मेश्राम, पदमाकर अंबादे, सुरेश भिवगडें, प्रकाश बनसोड, अभय दांडेकर, राजेश डंभारे, प्रकाश कांबळे, समिक्षा वानखेडे, प्रशांत ढोले, अरुणकुमार हर्शबोधी, संजय ओरके इत्यादी कवींनी रचना सादर केल्या... आंबेडकरी कविता पुढे आज असंख्य विषय उभे आहे...या जाज्वलीत विषयावर कवींनी आपली लेखणी वळविली पाहिजे' असे प्रेरित उद्गार अध्यक्ष संजय ओरके सरांनी याप्रसंगी काढले... कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन नियोजन संत गाडगेबाबा वाचनालयाचे विद्यार्थी व विश्वस्त यांनी केले..सुंदर अशा व-हाडी भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली...*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

______&____________________________________

बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा.

Comments