बोपापुर(खर्डा) येथे समता सैनिक दलाची सभा संपन्न*



  बोपापुर(खर्डा) येथे समता सैनिक दलाची सभा संपन्न*

***********†****†***********†****†*******†*****

 वर्धा:देवळी तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार बोपापुर(खर्डा) येथे समता सैनिक दल वर्धा जिल्हा युनिटद्वारे गाव तिथे शाखा, घर तिथे सैनिक, विहार तिथे वाचनालय, या अभियानांतर्गत समता सैनिक दलाची ग्राम शाखा स्थापन करण्यासंदर्भात सभा संपन्न झाली. 


        यावेळी विचार मंचावर सभेचे अध्यक्ष म्हणून वर्धा जिल्हा संघटक मार्शल अभय कुंभारे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सुरक्षा प्रमुख मार्शल प्रदीप कांबळे,उद्योजक जानराव पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

      सदर सभेला अभय कुंभारे यांनी समता सैनिक दल काळाची गरज या विषयावर संबोधित करतांना तरुणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्मित समता सैनिक दल या मात्रुसंघटनेत मोठ्या प्रमाणात सामिल होऊन संघटनेला मजबुती प्रदान करण्याचे आवाहन केले.

   यावेळी अकील शेळके, प्रफुल शेळके, नरेश लोहकरे, सुकानंद लोहकरे, अनंता लोहकरे, पुंडलीक शेळके, उत्तमराव शेळके, अमित शेळके, प्रदीप भगत, प्रभाकर शेळके, सम्यक लोहकरे,साहिल लोहकरे, पवन उमरे,राहुल लोहकरे, अमोल लोहकरे, संजय लोहकरे, धम्मदिप उमरे,भगवान लोहकरे, अनिकेत शेळके,सुजित शेळके, संघर्ष तेलंग,

आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments