भिम टायगर सेना" आक्रमक!


 𝚅𝚒𝚍𝚊𝚛𝚋𝚑 𝚝𝚒𝚐𝚎𝚛 𝚗𝚎𝚠𝚜, 📰

"भिम टायगर सेना" आक्रमक!

___________________________________________


विषय : आष्टी पोलीस स्टेशन मध्ये आरोपी राजेश श्रीराम ठाकरे रा.अंतोरा ता. आष्टी या इसमाने ने पीडित मंगेश तायवाडे रा.अंतोरा ता. आष्टी ला अमानुषपणे मारहाण केल्याबद्दल...


          दि.29 डिसेंबर 2021 ला पीडित : मंगेश तायवाडे रा. अंतोरा ता. आष्टी जि. वर्धा याला पोलीस स्टेशन आष्टी ला बोलावून आरोपी : राजेश श्रीराम ठाकरे रा. अंतोरा ता. आष्टी जि. वर्धा या गुंडप्रवृतीच्या व्यक्तीने

मंगेश तायवाडे ला पोलिसांच्या समोर, पोलिसांच्याच पट्ट्याने व काठीने अमानुषपणे मारहाण केली व त्याचा व्हीडिओ पण काढला. पोलीस स्टेशन मध्ये हा आरोपी बसून पीडिताला मारतो आणि पोलीस प्रशासन काहीच करत नव्हते. जेव्हा हा व्हीडिओ सगडीकडे गेला तेव्हा या आरोपीवर गुन्हा दाखल करून जेरबंद करण्यात. त्यामध्ये मुख्य आरोपी : राजेश श्रीराम ठाकरे, सह आरोपी : आंबेकर, पोलीस हवालदार : घायवट हे असे तीन लोकांना अटक केलेली आहे. पण त्या प्रकरनामध्ये आणखी काही महत्वाचे आरोपी वर अद्यापही कुठली ही कार्यवाही पोलीस प्रशासनाने केलेली नाही. आणि पीडिताच्या परिवाराला आरोपीचे सहकारी धमक्या देऊन त्यांना मानसिक त्रास देत असून त्यांच्या वर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. तरी सदरील प्रकरणाची अति संवेदनशीलता लक्षात घेता पीडिताच्या परिवाराला त्वरित सुरक्षा देण्यात यावी आणि मोकाट फिरत असलेले आरोपी त्यांना तात्काळ अटक करावी.

सध्या बाहेर असलेले आरोपी व धमक्या देणारे आरोपी : (1) पोलीस हवालदार-अंबुडारे (2) प्रशांत पांडे (अंतोरा), (3) सागर डाहे (अंतोरा)


मागण्या : मोकाट असलेले पूर्ण सह आरोपी यांना तात्काळ अटक करावी व पीडित परिवाराला पोलीस सुरक्षा द्यावी.

आणि जर आमच्या या मागण्या 24 तासाच्या आत पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. आणि यामध्ये कायदा सु -व्यवस्था भंग झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील.

अशी ठाम भूमिका



भिम टायगर सेना,आर्वी

नवनियुक्त तालुका अध्यक्ष

 *मा. अक्षयभाऊ भगत* यांनी ठेवली आहे.

Comments