महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्य 22 प्रतिज्ञा.

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 22 प्रतिज्ञा....
१. मी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनाा देेव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
२.मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
३. गौर- गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेव तेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
४. देवाने अवतार घेतते माझा विश्वास नाही.
५. बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय, असे मी मानतो.
६. मी श्राद्धपक्ष करणार नाही ; पिंडदान करणार नाही.
७. बुद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेच आचार कर्म मी करणार नाही.
८. कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणांच्या हातून करून घेणार नाही.
९. सर्व मनुष्यमात्र समान आहेत, असे मी मानतो.
१०. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.
११. मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब. करीन.
१२. मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या दहा पारमिता पाळिन.
१३. मी सर्व प्राणीमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.
१४. मी चोरी करणार नाही.
१५. मी खोटे बोलणार नाही.
१६. मी व्यभिचार करणार नाही.
१७. मी दारू पिणार नाही.
१८. मी प्रज्ञा, शील आणि करुणा या बौद्ध धम्माच्या तीन तत्वांची सांगड घालून माझे जीवन चालवीन.
१९. माझ्या जुन्या मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्यमात्राला असलेल्या व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बुद्धाच्या धम्माचा स्वीकार करतो.
२०. बुद्ध धम्म हा सधम्म आहे, अशी माझी खात्री पटलेली आहे.
२१. माझा नवा जन्म होत आहे, असे मी मानतो.
२२. इत: पर मी बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन, प्रतिज्ञा करतो....
मित्रांनो हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 22 प्रतिज्ञा. जर तुम्ही जर ह्या प्रतिज्ञा जर जाणीपूर्वक या जीवनात जर पार पाडल्या तर आपलं जीवन सुखद होईल. 

लेख आवडल्यास समोर शेअर करा जेणेकरून दुसऱ्यांना पण माहीत व्हायला पाहिजे हा बावीस प्रतिज्ञा....
(जय भीम नमो बुद्धाय)..

Comments