भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चांगली जाण होती. त्यांचा याविषयी मोठा अभ्यास होता. त्यांनी शेती व शेतकऱ्यांसाठी मोठा संघर्ष केला. त्यांचा कृषी विषयक दृष्टिकोन आरशासारखा स्पष्ट होता. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी स्वातंत्र्य पूर्वी ते ब्रिटिशांसोबत लढले. त्यांचे शेती विषयक विचार आजही जसेच्या तसे लागू होतात.
शेतकरी बांधवांना समूहात एकत्रित करून त्यांच्या हितासाठी काय केले पाहिजे याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर रस्ता ते संसदेपर्यंत शेतकऱ्यांसाठी ते लढले. शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे करण्यापासून ते शेतकरी मोर्चा सभांना मार्गदर्शन करण्याची मोठे कार्य त्यांनी केले. ब्रिटिश आणि भारत शासनाकडून शेतकऱ्यांसाठी न्याय मागणे मिळवणे व शेतकऱ्यांना जागरूक करणे अशा दोन्ही दिशेने त्यांनी प्रभावी कार्य केले.
(जय भीम नमो बुद्धाय)
Comments
Post a Comment