गरीब मागास जनतेचे कल्याण हाच प्रमुख उद्देश्य समोर ठेवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्युत आणि जल क्षेत्राच्या विकासासंदर्भात दूरदृष्टीची मते मांडली. त्यांच्या मताचा भारताच्या जल आणि विद्युत क्षेत्रावर मोठा प्रभाव पडल्याचे दिसून येते. 1942 साली व्हाइसरॉयच्या मंत्रिमंडळात डॉ. आंबेडकर यांची श्रम मंत्री म्हणून नियुक्ती झाली. याशिवाय जल आणि ऊर्जा विभागाची जबाबदारही त्यांच्यावर सोपवण्यात आली. त्यानंतर परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1942 ते 194६ या कालखंडात भारतातील जल व्यवस्थापन तसेच ऊर्जा निर्मिती संदर्भात दिशादर्शक आणि धोरणात्मक निर्णय घेतले. केंद्रीय वीज प्राधिकरणाची स्थापना नोो्हेंबर 1944 मध्ये करण्यात आली. या प्राधिकरणामार्फत देशाचेेे वीज धोरण निश्चित केले जाते.
(जय भीम नमो बुद्धाय)
My WhatsApp number
Comments
Post a Comment