बाबासाहेब :जलनीतीचे उद्गाते भाग 2

 

 बहुउद्देशीय प्रकल्पांच्या नियोजनाचा पाया :-

           भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या  जलनितीचा  स्वीकार सर्व संबंधिताकडून करण्यात आला. या नीतीचा फायदा होवून देशातील नदीखोरे  प्राधिकरणाच्या  माध्यमातून  बहुउद्देशीय  प्रकल्पांच्या  नियोजनाचा  पाया  रचला  गेला.  त्यातूनच  दामोदर खोरे  योजना, सोन  नदी  खोरे  विशाल योजना, महानदी  व  कोसी व  इतर नदी खोरे विकास  योजना (चंबल व  इतर दक्षिणेकडील नद्यांवरील प्रकल्प ) या योजना  फलद्रुप झाल्या. या सर्व योजना  पूर  नियंत्रण, सिंचन, जलवाहतूक, पिणाच्या  पाणी योजना, जलविद्युत आणि  इतर गरजांसाठी राबवण्यात आल्या. दामोदर खोरे विकास महामंडळाचे लाभक्षेत्र 24235चौ. मी. इतके बिहार आणि पश्चिम  बंगाल राज्यात आहे. दामोदर नदीचा उगम पश्चिम बिहार येथे झाला असून सुमारे 540 कि. मी. बिहार राज्यातून व 250 कि. मी पश्चिम बंगालमधून प्रवास करून कोलकत्ता  पासून  50 कि. मी. वर हुगळी नदीला मिळते. दामोदर नदी ही  तिच्या विनाशकारी गुणधर्मांमुळे कुप्रसिद्ध  होती. तिला  दुःख  प्रसवणारी नदी (River of  sorrow ) म्हणून ओळखले जात असे. 

           हिराकूड आणि सोन नदी प्रकल्पाबाबत       

           महानदी ही ओरिसा प्रातांतील सर्वात मोठी नदी आहे. जुलै ऑगस्ट 1943 मध्ये महापुराने हाहाकार  माजला. महानदीच्या खोऱ्यातील लोकांना वर्षातून आळीपाळीने महापूर, पाणीटंचाई व  दुष्काळाचा सामना करावा लागत असे. आरोग्य, दळणवळणाच्या असुविधा, गरिबी दारिद्र्याच्या समस्या, प्रचंड जलसंपत्तीचा स्रोत असून सुद्धा नियोजनाअभावी दयनीय अवस्था होती. अमेरिकेतील मिसौरी, मियांनी आणि टेनेसी नद्यांच्या भागांत अशांत समस्या होत्या. बोधिसत्व डॉ. बाबासाहेबानी अमेरिकेतील या खोऱ्यातील विविध उपाययोजनांचा अभ्यास  केला. नद्यांना ठिकठिकाणी बांध बांधून पाणी अडवणे, ज्यायोगे मातीचे कायमस्वरूपी संवर्धन होईलच, पाण्याचेही संवर्धन होईल आणि हे प्रकल्प बहुउद्देशीय केले. महानदीवरील  हिराकूड धरणाचा 3, 24,000 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ झाला. 50 मेगावॅट वीजनिर्मिती झाली. हिराकूड धरण त्यावेळी जगातील सर्वात मोठे धरण ठरले. सिलोनच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट क्षेत्र एका प्रकल्पाचे जलाशय आहे. हिराकूड धरण 1957 मध्ये पूर्ण झाले आणि ओरिसा राज्य वैभवसंपन्न व सशक्त झाले, याचे सर्वस्वी श्रेय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदर्शी नेतृत्वाला आहे.  

                         ( जय भिम नमो बुध्दाय जय विदर्भ )

Comments