अशोका विजयादशमीच्या पर्वावर धम्मक्रांती दिनानिमित्त डब्लिपूर गावी तथागत बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे अनावरण.


 Vidarbh tiger news

आर्वी(वर्धा ) :अशोका विजयादशमीच्या पर्वावर धम्मक्रांती दिनानिमित्त डब्लिपूर गावी तथागत बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे अनावरण.


आज दिनांक 25 ऑक्टोबर 2020 ला डब्लिपूर या गावी अशोका विजयादशमी धम्मक्रांती दिनानिमित्त महाकारुणिक तथागत बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सवाई परिवार वतीने प्रतिमांचा अनावरण समारंभ पार पडला.

आर्वी येथील धम्मप्रचारक सुरेश भीवगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख अतिथी प्रज्वल डंभारे भीम टायगर सेना उपजिल्हाध्यक्ष विध्यार्थी सेना ,राकेश डंभारे  राजूभाऊ राठी जिल्हापरिषद सदस्य, विजयभाऊ पुसतकर, उपसरपंच शंकर उईके आशीफ पठाण संतोष सवाई, दिनेश सवाई सुभाष सवाई आकाश सवाई  रवीभाऊ देशभ्रतार सचिन मनवरे आदी मान्यवर उपस्थित होते

आदरणीय संतोष सवाई व सवाई परिवार यांच्या वतीने डब्लिपूर या गावी बुद्धमूर्ती व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा दान देण्यात आली.. बाबासाहेबांच्या स्वप्नातील धम्म संस्कार केंद्र तयार करण्याच्या दिशेने  आपण प्रयत्न केले पाहिजेत असे विचार धम्म प्रचारक सुरेश भीवगडे यांनी केले

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन किशोर रामटेके  यांनी केले. याप्रसंगी धम्मगीत सचिन मनवर यांनी केले.



बातम्या प्रकाशित करण्यासाठी किंवा स्वतःचे विचार मांडण्यासाठी 9561750423 या व्हाट्सअँप नंबर मला संपर्क करा.. 

जय भीम नमो बुध्दाय  जय विदर्भ.... 

Comments