ऑनलाईन विदर्भ टायगर न्युज : नागपूर विद्यापीठ :नेटवर्क येत नसेल तर विद्यार्थ्यांना कागदावर रोल नंबर, विषय, अभ्यास क्रम व मोबाईल क्रमांक लिहून एकाखालोखाल प्रश्न व बरोबर पर्याय लिहिता येणार आहे. हा पेपर e- मेल वर पाठविता येईल
ठळक मुद्दे.
प्लेस्टोअर वरून ऍप करता येईल 'अपडेट '
नागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अंतिम वर्षाच्या परीक्षांची तयारी त्वरित काम सुरु आहे. विद्यापीठाने परीक्षेसाठी मोबाईल ऍप तयार केले असून इंटरनेट च्या नेटवर्क अभावी विद्यार्थ्यांना पेपर अपलोड करता आला नाही तरी आता घाबरण्याची गरज राहिलेली नाही. अशा स्थितीत थेठ विद्यापीठाने दिलेल्या व्हाट्सअँप क्रमांक किंवा e-मेल वर सोडविलेल्या पेपर पाठवता येणार आहे. विद्यार्थ्यांना पडणाऱ्या प्रश्नासंबंधात विद्यापीठाने उत्तरसूची जरी केली असून त्यात ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे.
परीक्षेदरम्यान नेटवर्क गेले तरी प्रश्नप्रत्रिका सोडविणे शक्य होणार आहे. नेटवर्क आल्यानंतर उत्तरे दोन तासांच्या आत सबमिट करता येणार आहे. मात्र या कालावधीनंतरदेखील नेटवर्क येत नसेल तर विद्यार्थ्यांना कागदावर रोल नंबर, विषय, अभ्यास क्रम व मोबाईल क्रमांक लिहून एकाखालोखाल प्रश्न व बरोबर पर्याय लिहिता येणार आहे. हा पेपर ई -मेल वर पाठविता येईल. यादरम्यान ऍप विद्यार्थ्यांच्या हालचाली, आवाज रेकॉर्ड करत राहील. गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे थेठ व्हीजिलेंस समितीकडे पाठविण्यात येथील, असे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले आहे संबंधित ऍप हे 'google playstore, वर उपलब्ध आहे. हे ऍप विद्यार्थ्यांनी नियमितपणे अपडेट करावे असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
प्राचार्यांशी संपर्क साधावा.
काही विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक अपडेट होऊ शकतो. अशा स्थितीत प्रवेशपत्र डाउनलोड झाले नाही तर महाविद्यालयांतील प्राचार्यांशी संपर्क साधावा. प्राचार्य विद्यापीठ यंत्रणेशी संपर्क साधतील व समस्येचे निराकरण होईल 'असे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले आहे..
ऍप मध्ये अडचण आली तर हे करा
विद्यार्थ्यांना ऍप संदर्भात अडचणी येत असल्यास अगोदर ते अनइन्स्टोल करावे व त्यानंतर नवीन ऍप डाउनलोड करावे. महाविद्यालयातून मिळालेल्या हॉल तिकिटमध्ये आणि परीक्षेसंदर्भातील ऍप मध्ये प्रत्येकाने आपले नाव, रोल नंबर, मोबाईल नंबर तसेच विषय बरोबर आहेत काय ते तपासून घ्यावे. यासंदर्भात काही अडचणी असल्यास त्वरित महाविद्यालयातून मोबाईल नंबर तसेच नावांमधील असलेला बदल करता येईल. कारण महाविद्यालयातील लॉगिंवरून हे त्वरित करने शक्य आहे
- न्युज by लोकमत...
( जय भीम नमो बुध्दाय जय विदर्भ )..........................
Comments
Post a Comment