विज्ञान -तंत्रज्ञानाची सांगड....
कृषी वैज्ञानिक व शेतकऱ्यांनी कृषी क्रांति आणली ही अभिमानाची बाब आहे. पंजाब मध्ये कृषी वैज्ञानिक जातात. तेव्हा पीक उपाययोजना तसेच अधिक उत्पादनासाठी नव्या पद्धती सांगण्याआधीच ;शेतकरी त्यांना शेकडो शेती उत्पन्नाचे प्रश्न विचारतात, नवनव्या उपाययोजना विचारून नवेनवे प्रयोग करतात, नव्या पद्धती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्न कसे वाढविता येईल, याचा सदैव विचार करताना दिसतात. अशी जागरूकता देशात सर्वत्र असायला हवी...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, त्यांच्या दुःखावर शंभर टक्के इलाज केला आहे. पण इलाजासोबत पथ्य पाळणे तितकेच महत्वाचे आहे. कृषी विज्ञान व तंत्रज्ञानाची सांगड घालून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित कृषी विकास साधता येईल............... डॉ. अनिल ढेंगळे (सूर्या )(संपादित )
साभार :लोकराज्य......
Comments
Post a Comment