बाबासाहेब : शेतकऱ्यांचे हितकर्ते भाग 3


 संघटित व्हा..... 

        शेती व शेतकऱ्यांच्या हिताचे, रक्षणाचे व लाभाचे कायदे केले. बाबासाहेबांचे विचार म्हणजे सर्वांगीण विकासाचा मूलमंत्र आहे. शेती व शेतकऱ्यांच्या विकासाचे ते अमूल्यसुत्र आहे. परंतु, आज शेतकरी व शेती विकास कुठपर्यंत झाला व त्या सोबत ठळक प्रमाणात कोणत्या समस्या निर्माण झाल्या व त्यावर उपाय काय हे बघू या... भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नपूर्तीची स्वातंत्र्य भारतात कितपत पूर्ती झाली आहे? शेती व शेतकऱ्यांचे हित साधले जात आहे का? कृषी विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले, त्या प्रयत्नांना यश प्राप्त होत आहे काय? यावर चर्चा होने आवश्यक आहे. स्वातंत्र्य भारताचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू ते आजचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या 70 वर्षांच्या काळात निश्चितच सुधारणा झाल्या आहेत. विविध क्षेत्रात भारत पुढे गेला आहे व अजून पुढे जाणे बाकी आहे. कृषी संदर्भात शासन स्तरावरील निर्णय -शेती, शेतकऱ्यांना पुढे नेणारे, विकासाकडे नेणारे आहेत. सोने उगवण्याची शंभर टक्के शक्यता असणारी शेतजमीन बघता व स्वातंत्र्यत्तर इतका दीर्घकाळ बघता हवी तेवढी सुधारणा झाली नाही. शिवाय आता पर्यंत झालेल्या सुधारणांसह काही समस्या व काही प्रश्नही निर्माण झाले आहेत. 

           शेती व शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा येणार नाही. स्थानिक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार नाही. त्यांच्या कुटुंबाचे नुकसान होऊ नये, त्यांच्या अज्ञानामुळे त्यांची फसवणूक होऊ नये, अन्याय होऊ नये म्हणून रक्षणार्थ कायदे तयार केले आहेत. शेतकऱ्याला त्याच्या जमिनी चा कायद्याने योग्य मोबदला मिळायला हवा. शेतात शेतकरी  व भाजी मार्केटमध्येही शेतकरीच दिसायला हवा. या मुळे स्वस्त दरात ग्राहकांना  ताज्या भाज्या मिळतील. शेतकरी अधिकाधिक श्रम करतो. नैसर्गिक आपत्ती सहन करतो. त्याला त्यांचा मोबदला मिळायला पाहिजे. त्यासाठी शेतकरी व मजुरांनी संघटित होने आवश्यक असल्याचे परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे.... 




जय भीम नमो बुध्दाय जय विदर्भ....... 

माझा मोबाईल numbar 9561750423.. 

Comments