भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण भाग 6.
नरकातून सुटलो
मला एका गोष्टीचे मात्र आश्चर्य वाटते. एवढा वादविवाद सर्वत्र होतो आहे. पण एकाही माणसाने 'मी बौद्ध धर्मच कां स्वीकारला 'हा प्रश्न मला बिचारला नाही. कोणताही धर्म न स्वीकारता हाच धर्म कां स्वीकारला, हा कोणत्याही धर्मांतराच्या चळवळीतील मुख्य आणि महत्वाचा प्रश्न असतो. धर्मांतर करतांना धर्म कोणता व कां घ्यावयाचा हे तावून सुलाखून पाहिजे. आम्ही हिंदुधर्म त्यागाची चळवळ 1935 पासून येवले येथे एक ठराव करून हाती घेतली. 'मी हिंदुधर्मात जन्मलो तरी हिंदुधर्मात मरणार नाही 'अशी प्रतिज्ञा मी मागेच केली होती आणि काल मी ती खरी करून दाखवली. मला इतका आनंद झाला आहे कि नरकातून सुटलो असे मला वाटते. मला कोणी अंधभक्त नको आहेत. ज्यांना बौद्ध धर्मात यावयाचे आहे त्यांनी जाणिवेने आले पाहिजे. त्यांना धर्म पटला पाहिजे.
कार्ल मार्क्सचा पंथ व आम्ही
मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला धर्म ही अत्यंत आवश्यक वस्तू आहे. मला माहित आहे कि कार्ल मार्क्सच्या वाचनामुळे एक पंथ निघाला आहे त्याच्या म्हणण्याप्रमाणे धर्म म्हणजे काहीच नाही. त्यांना धर्माचे महत्व नाही. त्यांना सकाळी ब्रेकफास्ट (न्याहारी )मिळाली, त्यात पाव, मलई, लोणी, कोंबडीची टांग वगैरे असले, पोटभर जेवण मिळाले, निवांत झोप मिळाली कि सगळं संपलं. हे त्याच तत्वज्ञान !मी त्या मतांचा नाही. माझे वडील गरीब होते, म्हणून मला या प्रकारचे सुख काही मिळालेले नाही. माझ्या इतके कष्टमय जीवन कोणीही आयुष्यात काढलेले नाही म्हणून माणसाचे जीवन सुखसमाधानाच्या अभावी कसे कष्टमय होते याची मला जाणीव आहे. आर्थिक उन्नतीची चळवळ आवश्यक आहे असे मी मानतो. त्या चळवळी विरुद्ध मी नाही माणसाची आर्थिक उन्नती व्हावयाय पाहिजेच.
रेडा, बैल व माणूस
पण मी याबाबत एक महत्वाचा फरक करतो. रेडा, बैल व माणूस यामध्ये फरक आहे. रेडा व बैल यांना रोज वैरण लागते. माणसासही अन्न लागते. मात्र दोहोत फरक हा आहे कि रेडा व बैल यांना मन नाही, मनुष्याला शरीराबरोबर मनही आहे. म्हणून दिन्हीचाही विचार करावयास हवा. मनाचा विकास झाला पाहिजे. मन सुसंस्कृत झाले पाहिजे. ज्या देशातील लोक अन्नाशिवाय माणसाचा सुसंस्क्रुत मनाशी संबंध नाही असे म्हंणतात त्या देशाशी अगर लोकांशी संबंध ठेवण्याचे मला काहीच प्रयोजन नाही. जनतेशी संबंध ठेवताना माणसाचे शरीर जसे निरोगी पाहिजे तसें शरीर सुदृढ होण्याबरोबर मनही सुसंस्कृत झाले पाहिजे. एरव्ही मानव जातीचा उत्कर्ष झाला असे म्हणतात येणार नाही.
हे भाषण धम्मचक्र प्रवर्तन ते अनुवर्तन या पुस्तकातून हा लेक लिहिण्यात आला आहे....
उर्वरीत भाग 7 उद्या....
जय भीम नमो बुध्दाय जय विदर्भ
(बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423या व्हाट्सअँप नंबर वर मला संपर्क करा..... )
Comments
Post a Comment