दि. 15 ऑक्टोबर 1956 नागपूर दिक्षा समारंभानंतर दिलेले विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण भाग 10
सर्वांना क्रातींकारी जय भीम नमो बुध्दाय... अशोक विजयादशमीच्या बुद्धमय शुभेच्छा....
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः दिलेले भाषण पुढील प्रमाणे :
भगवंताचा समतेचा उपदेश :
बौद्धधर्मात 75 टक्के ब्राम्हण भिक्षु होते. 25 टक्के शूद्रादि होते. परंतु भगवंतांनी सांगितले. "हे भिक्खुहो, तुम्ही निरनिराळ्या देशातून व जातींतून आला आहात. आपल्या प्रदेशातून नद्या वाहतात तेव्हा त्या पृथक पृथक असतात, मात्र त्या सागरास मिळाल्या कि त्या पृथक राहात नाहीत. त्या एकजीव व समान होतात. बौद्धसंघ हा सागराप्रमाणे आहे या संघात सर्व सारखे व समान "!सागरास गेल्यावर हे गंगेचे पाणी किंवा हे महानदीचे पाणी असे ओळखणे अशक्य असते. त्याप्रमाणे बौद्धसंघात आले म्हणजे आपली जात जाते व सर्वजण समान असतात. असे समतेने सांगणारा एकच महापुरुष आहे आणि तो महापुरुष म्हणजे भगवान बुद्ध होय.(प्रचंड टाळ्या )
माझ्यावरील प्रचंड जबाबदारी :
काही लोक असे म्हणतात, तुम्ही धर्मांतर करण्यास इतका अवधी कां लावला? इतके दिवस काय करीत होता? हा प्रश्न. महत्वाचा आहे. धर्म पटवून देणे हे काम सोपे नाही. ते एका माणसाचे काम नाही. धर्माबाबत विचार करणाऱ्या कोणत्याही माणसास हे समजून येईल. माझ्यावर जेवढी जबाबदारी आहे तेवढी जबाबदारी जगातील कोणत्याही माणसावर नाही. मला अधिक आयुष्य लाभल्यास mi योजलेले कार्य पूर्ण करिन? (डॉ. बाबासाहेब चिरावू होवोत च्या घोषणा व निनादा !)
महार बौद्ध म्हणून हिणवू नका :
महार बौद्ध झाले तर काय होईल, असे काही लोक म्हणतील. असे त्यांनी म्हणू नये, असे माझे त्यांना सांगणे आहे. ते त्यांना धोकादायक होईल. वरिष्ठ व संपत्तिवान वर्गाला धर्माची आवश्यकता वाटणार नाही. त्यांच्यामधील अधिकारावर असलेल्या साहेब लोकांना राहण्यास बंगला आहे, त्यांची सेवा करावयास चाकर नोकर आहेत. त्यांना धन संपत्ती आहे, मानमरातब आहे, अशा माणसांना धर्माबद्दल विचार अगर चिंता करण्याचे कारण नाही .
धर्माची आवश्यकता गरिबांना !:
धर्माची आवश्यकता गरिबांना आहे. पीडित लोकांना धर्माची आवश्यकता आहे. गरीब मनुष्यजगतो तो आशेवर. Hope! जीवनाचे मूळ आहेत आहे. आशाच नष्ट झाली तर जीवन कसे होईल? धर्म आशादायी बनवितो, व पीडितांना, गरिबांना संदेश देतो, "काही घाबरू नकोस, होईल, जीवन आशादायी होईल "म्हणून गरीब व पीडित मनुष्यमात्र धर्माला चिकटून राहतो.
हे भाषण धम्मचक्र प्रवर्तन ते अनुवर्तन या पुस्तकातून लिहिला आहे...... पुस्तकाचे चित्र पुढील प्रमाणे.
जय भीम नमो बुध्दाय. जय विदर्भ......................
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या व्हाट्सअँप नंबर संपर्क साधावा...
Comments
Post a Comment