दि. 15 ऑक्टोबर 1956 नागपूर दिक्षा समारंभानंतर दिलेले विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण भाग 11
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण :
ख्रिस्ती धर्माचा इतिहास कायसांगतो? :
जेव्हा युरोपमध्ये ख्रिस्ती धर्म शिरला त्यावेळी रोमची व आसपासच्या देशांची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. लोकांना पोटभर जेवणही मिळत नव्हते. त्यामुळे गरीब लोकांना खिचडी वाटण्यात येत असे त्यावेळी ख्रिस्ताचे अनुयायी कोण झाले? गरीब पिडलेले लोकच झाले. युरोपमधील सर्व गरीब व कनिष्ठ जनता, ख्रिस्ती बनली. हा ख्रिश्चन धर्म भीक मागणाऱ्यांच्या आहे, असे गिबनने म्हटले होते. ख्रिसती धर्म हा युरोपमध्ये सर्वांचा धर्म कसा झाला, याचे उत्तर घ्यावयास गिबन आज हयात नाही, नाहीतर याचेही उत्तर त्याला घ्यावे लागले असते .
जग बुद्धालाच मानते :
काही लोक असे म्हणतील, हा बौद्ध धर्म महारड्या -मांगांचा धर्म आहे. ब्राम्हण लोक भगवंताला भो गौतम म्हणजे 'अरे गौतम 'असे म्हणत असत. ब्राम्हण बुद्धाला असे हिणवीत चिडवीत असत. पण राम, कृष्ण, शंकर यांच्या मूर्ती परदेशात विकावयास ठेवल्या तर किती खपतील ते पाहावे. पण बुद्धाची मूर्ती ठेवली तर एकही मूर्ती शिल्लक राहणार नाही. (टाळ्यांचा कडकडाट )आता घरातल्या घरात (भारतात )हे पुष्कळ झालं, बाहेर काही दाखवा. जगात नाव जाहीर आहे ते फक्त बुद्धाचेच !तेव्हा ह्या धर्माचा प्रसार झाल्याशिवाय कसा राहील?
आमचा मार्ग बौद्धमार्ग :
आमच्या वाटेने आम्ही जाऊ, तुमच्या वाटेने तुम्ही जावे. आम्हाला नवीन वाट मिळाली आहे. हा आशेचा दिवस आहे. हा अभ्युदयाचा, उत्कर्षाचा मार्ग आहे. हा मार्ग काही नवीन नाही. हा. मार्ग कोठून आणलेला नाही. हा मार्ग येथलाच आहे, भारतातीलच आहे. या देशामध्ये 2000 वर्षे बौद्धधर्म होतो. खरे. म्हणजे, या पूर्वीच आम्ही बौद्ध धर्मात कां गेलो नाही, याचीच आम्हाला खंत वाटते. भगवान बुद्धाने सांगितलेली तत्वे अजरामर आहेत. पण बुद्धाने मात्र तसा दावा केलेला नाही. कालानुरूप बदल करण्याची सोयत्यात आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.
हे भाषण धम्मचक्र प्रवर्तन ते अनुवर्तन या पुस्तकातून घेतला आहे किंवा लिहिला आहे.. पुस्तकाची पूर्ण माहिती पुढील प्रमाणे. :
बातम्या प्रकाशित करण्यासाठी व विचार मांडण्यासाठी 9561750423 या व्हाट्सअँप नंबर वर मला संपर्क साधावा (जय भीम नमो बुध्दाय जय विदर्भ )
Comments
Post a Comment