दि. 15 ऑक्टोबर 1956 नागपूर दिक्षा समारंभानंतर दिलेले विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण भाग 12



विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण :

मिलिंद व नागसेन :

        बौद्धधर्माचा नाश झाला याचे मुख्यकारण मुसलमानांच्या स्वाऱ्या हे होय. मुसलमानांनी स्वाऱ्यांध्ये मूर्ती फोडून टाकल्या. बौद्धधर्मावर यामुळे पहिले आक्रमण झाले. त्यांच्या स्वाऱ्यांना भिऊन बौद्ध भिक्खू नाहीसे झाले. कोणी तिबेटला गेले !कोणी चीनला गेले, कोणी कोठे गेले !धर्माचे संरक्षण करण्यासाठी उपासक लोक हवे असतात. वायव्य सरहद्द प्रांतात एक राजा होता. त्याचे नाव मिलिंद. हा राजा सदोदित वादविवाद करीत असे. वादविवादाची त्यास मोठी आवड होती. तो हिंदूंना सांगे, जो कोणी वादविवादपटू असेल त्याने येऊन वादविवाद करावा. त्याने पिष्कळांना निरुत्तर केले होते. 

     एकदा त्याला बौद्ध लोकांबरोबर वादविवाद करावा असे वाटले, व वादविवाद पटू कोणी बौद्ध असल्यास त्यास घेऊन यावे असे त्याने सांगितले. तेव्हा बौद्ध लोकांनी नागसेनास विनंती केली कि तुम्ही या वादविवादात बौद्ध जणांची बाजू मांडावी. नागसेन विद्वान होता. तो पूर्वीचा ब्राह्मणहोता. नागसेनाचा व मिलिंदचा जो वादविवाद झाला तो पुस्तक रूपाने जगाला माहित आहे. त्या पुस्तकाचे नाव 'मिलिंद पन्ह ' आहे. मिलिंदने असा प्रश्न विचारला कि धर्मास ग्लानी कां येते? नागसेनाने त्याचे उत्तर देऊन त्यांची तीन कारणे सांगितली. 

धर्म ग्लानीची तीन कारणे :

1.पहिले कारण हे कि एखादा धर्मच कच्चा असतो. त्या धर्माच्या मूळ तत्वात गांभीर्य नसते. तो कालिक धर्म बनतो व कालानुसार असा धर्म टिकतो. 

2.दुसरे कारण हे कि धर्म प्रचार करणारे विद्वान लोक सतील तर धर्मग्लानी होते. ज्ञानी माणसांनी धर्म -ज्ञान सांगितले पाहिजे. विरोधकांशी वादविवाद करण्यास धर्माचे प्रचारक सिद्ध नसतील तर धर्माला ग्लानी येते. 

3.आणि तिसरे कारण हे कि धर्म व धर्माची तत्वे विद्वानासाठी असतात प्राकृत व सामान्य लोकांकरिता मंदिरे -देवळे असतात. ते तेथे जाऊन आपल्या श्रेष्ठ विभूतीचे पूजन करतात. 

हे भाषण धम्मचक्र प्रवर्तन ते अनुवर्तन या पुस्तकातून लिहिला आहे. पुस्तकाचे चित्र पुढील प्रमाणे. 



बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या व्हाट्सअँप नंबर मला संपर्क साधावा.. 

जय भीम नमो बुध्दाय जय विदर्भ.......    

Comments