विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण. :
एकमेव उदारतेचा धर्म :
आपण बौद्ध धर्म स्वीकारताना ही कारण लक्षात ठेवली पाहिजेत. बौद्धधर्माची तत्वे कालिके (काही कालापुरती )आहेत असे कोणासही म्हणता यावयाचे नाही. आज 2500 वर्षांनंतरही बुद्धाची सारी तत्वे सर्व जग मानते. अमेरिकेमध्ये बुद्धाच्या 2000 संस्था आहेत. इंग्लंडमध्ये 30000 रुपये खर्च करून बौद्ध मंदिर बांधण्यात आले आहे. जर्मनीतही 3/4 हजार बौद्ध संस्था आहेत. बुद्धाची तत्वे अजरामर आहेत. तथापि बुद्धांनी असा दावा केला नाही कि हा धर्म ईश्वराचा आहे. बुद्धांनी सांगितले माझे वडील प्राकृत होते, माझी आई प्राकृत बाई होती. हा धर्म तुम्हाला वाटेल तर घ्यावा. हा धर्म जेव्हा तुमच्या बुद्धीला पटेल तेव्हा तो तुम्ही स्वीकारा एवढी उदारता दुसऱ्या कोणत्याही धर्मात सांगितलेली नाही.
बौद्धधर्माचे कार्य गरिबांचे दुःख कमी करणे :
बौद्धधर्माचा मूळ पाया काय आहे? इतर धर्मात व बौद्धधर्मात फार फरक आहे. इतर धर्मात बदल हा घडून यावयाचा नाही, कारण मनुष्य व ईश्वर यांचा संबंध ते धर्म सांगतात. इतर धर्माचे म्हणणे असे कि ईश्वराने सृष्टी निर्माण केली, ईश्वराने आकाश, वायू, चंद्र, सूर्य सर्वकाही निर्माण केले. आम्हाला ईश्वराने काहीही करावयाचे ठेवले नाही, म्हणून ईश्वरास भजावे !ख्रिस्ती धर्माप्रमाणे तर मृत्यूनंतर एक निर्णयाचा दिवस (day of judgement)असतो, व त्या निर्णयाप्रमाणे सर्व काही घडते. देव व आत्मा यांना बौद्धधर्मात जागा नाही. भगवान बुद्धांनी सांगितले, जगात सर्वत्र दुःख आहे, 90 टक्के माणसे दुःखाने पिडलेली आहेत. त्या दुःखातून पिडलेल्या, गरीब माणसांना मुक्त करणे हे बौद्ध धर्माचे मुख्य कार्य आहे. बुद्धा पेक्षा कार्ल मार्क्सने वेगळे काय सांगितले? भगवंतांनी जे सांगितले, ते वेड्या वाकड्या मार्गाने सांगितले नाही
हे भाषण धम्मचक्र प्रवर्तन ते अनुवर्तन या पुस्तकातून लिहिला आहे ...... पुस्तकाचे चित्र पुढील प्रमाणे.
अश्या अनेक बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या व्हाट्सअँप नंबर वर मला संपर्क करा ......... (जय भीम नमो बुध्दाय जय विदर्भ.. )
Comments
Post a Comment