दि. 15 ऑक्टोबर 1956 नागपूर दिक्षा समारंभानंतर दिलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण भाग 14


 भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण :

माझ्या बांधवांचे कार्य :

            बंधुनो, मला सांगावयाचे होते ते सांगितले . हा धर्म सर्वतोपरी परिपूर्ण आहे. त्यास लांछन कोठेच नाही. हिंदुधर्माची अशी काही तत्त्वप्रणाली आहे कि त्यामधून उत्साहच निर्माण होऊ शकत नाही. हजारो वर्षांपासून, परवापर्यंत आपल्या समाजामधून एकही मनुष्ट ग्रॅज्युएट अगर विद्धान होऊ शकला नाही. मला सांगावयास हरकत नाही. कि माझ्या शाळेत झाडलोट करणारी एक बाई होती. ती मराठा होती. ती मला शिवत नसे. माझी आई मला सांगत असे कि मोठ्या माणसास मामा म्हणत जा. पोस्टमनला मी मामा म्हणत असे. (प्रचंड हशा )लहानपणी शाळेत असताना मला तहान लागली होती. मी मास्तरांना तसे सांगितले. मास्तरांनी माझ्या संरक्षणाकरिता चपराशाला दुसरीकडे बोलावीत व याला नळावर ने असे सांगितले. आम्ही नळावर गेलो. चपराशाने मग नळ सुरु केला व पाणी प्यालो. मला शाळेत पाणी प्यावयास मिळत नसे. पुढे मला डिस्ट्रिक्त जज्जाची नोकरी देऊ केली होती. पण ती घोरपड मी गळ्यात बांधून घेतली नाही. माझ्या बांधवांचे कार्य मग कोण करील, असे माझ्या पुढे कोडे होते, म्हणून मी नोकरीच्या बंधनात अडकलो नाही.. 

तुमच्या डोकीवरील उतरंड :

           मला वैयक्तिकरित्या या देशातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही (टाळ्या )तुमच्या डोक्यावर, वैश्य, क्षत्रिय, ब्राम्हण अशी जी उतरंड रचली आहे ती कशी उलटेल व मॉडेल हा खरा प्रश्न आहे.. म्हणून या धर्माचे ज्ञान सर्व प्रकारे तुम्हाला करून देणे हे माझे कर्तव्य आहे. मी पुस्तके लिहून तुमच्या शंका कुशंका दूर करिन व ज्ञानाच्या पूर्णावस्थेला तुम्हाला नेण्याचे सर्व प्रयत्न करिन. आज तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून वागले पाहिजे.. 

हे भाषण धम्मचक्र प्रवर्तन ते अनुवर्तन या पुस्तकातून लिहिला आहे. पुस्तकाचे चित्र पुढील प्रमाणे आहे. 



बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या व्हाटसअँप नंबर संपर्क करा.

              जय भीम नमो बुध्दाय जय विदर्भ                

Comments