दि. 15 ऑक्टोबर 1956 नागपूर दिक्षा समारंभानंतर दिलेले भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण भाग 15


 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण :

आपला व जगाचाही उद्धा करू :

             मात्र तुमची जबाबदारी मोठी आहे. तुमच्या बद्दल इतर लोकांना आदर वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे. हा धर्म म्हणजे आपण एका गळ्यात मढे अडकवून घेत आहोत असे मानू नका. बौद्धधर्माचे दृष्टीने भारताची भूमी सध्या शून्यवत आहे. म्हणून आपण उत्तम रीतीने धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. नाही तर महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीत आणला असे होऊ नये . म्हणून दृढ निश्चय केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण आपल्या बरोबर देशाला, इतकेच नव्हे तर जगाचाही उद्धार करू. कारण बौद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे. जगात जोपर्यंत न्यायमिळ्त नाही तोपर्यंत शांतता राहणार आहे. 

  प्राप्तीचा 20 वा हिस्सा देण्याचा निश्चयकरा :

           हा नवा मार्ग जबाबदारी आहे. आपण काही संकल्प केला आहे, काही इच्छिलेले आहे, हे तरुणांनी लक्षात घ्यावे. त्यांनी केवळ पोटाचे पाईक बनू नये. आपल्या प्राप्तीचा निदान 20 वा हिस्सा या कामी देईल, असा निश्चय करावा. मला सर्वांना बरोबर न्यावयाचे आहे. प्रथम तथागताने काही व्यक्तींना दिक्षा दिली व त्यांना "या धर्माचा प्रचार करा "असा आदेश दिला. त्याप्रमाणे पुढे यश व त्याच्या 40 मित्रांनी बौद्ध दिक्षा घेतली. यश हा श्रीमंत घराण्यातील होता. त्यांना भगवंताने सांगितले, हा धर्म कसा आहे? तर "बहुजन होताय बहुजन सुखाय, लोकानुकंपाय, धम्म आदी कल्याण, मध्यकल्याण, पर्यावसान कल्याण "त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे तथागताने आपल्या धर्माच्या प्रचाराचा मार्ग तयार केला. आता आपणालाही यंत्रणा तयार करावी लागेल म्हणून समारंभानंतर  दरेकाने दरेकाला दिक्षा घ्यावी. दरेक बौद्ध माणसाला दिक्षा देण्याचा अधिकार आहे असे मी जाहीर करतो. 

                                                                               


तुझेच धम्म हे फिरे जगावरी........... 

हे भाषण धम्मचक्र प्रवर्तन ते अनुवर्तन या पुस्तकातून लिहिला आहे... पुस्तकाचे चित्र पुढील प्रमाणे.... 



अश्या अनेक बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या व्हाट्सअँप नंबर मला संपर्क करा. 

         जय भीम नमो बुध्दाय जय विदर्भ          

Comments