उत्साहाचे मूळ, सुसंस्कृत मन :मनुष्याचे शरीर अथवा मन हे रोगी कां असते? त्यांची कारणे ही कि त्यास एक तर शारीरिक पीडा असते, किंवा मनाला उत्साह नसतो. मनात उत्साह नसेल तर अभयुदयही नाही. हा उत्साह कां राहत नाही? त्याचे पहिले कारण हे कि मनुष्यास रीतीने ठेवण्यात आले कि, त्याला वर येण्याची संधी मिळत नाही, अगर आशा राहत नाही. त्यावेळी त्यास उत्साह कोठून असणार? तो रोगीच असतो. ज्या माणसाला आपल्या कृतीचे फळ मिळू शकते, त्यास उत्साह प्राप्त होतो. नाही तर शाळेत शिक्षक असे म्हणू लागला, कि कोण रे हा? हा तर महार !आणि महारडा पहिल्या वर्गात पास होणार? याला प्रथम श्रेणी कशाला पाहिजे? तू आपला तृतीय श्रेणीतच राहा -पहिल्या वर्गात येणे हे ब्राम्हणाचे काम !अशा व्यवस्थेत त्या मुलाला काय उत्साह मिळणार? त्यांची उन्नती ती काय होणार? उत्साह निर्माण करण्याचे मूळ मनात आहे, ज्याचे शरीर व मनही धडधाकट असेल, जो हिम्मतबाज असेल, मी कोणत्याही परिस्थितीतून झगडून बाहेर पडेल असा ज्यास विश्वास वाटतो, त्यांच्या मध्येच उत्साह निर्माण होतो, व त्याचा उत्कर्ष होतो. हिंदुधर्मात अशी काही विलक्षण तत्त्वप्रणाली ग्रंथीत केलेली आहे, कि माणसाला निरुत्साही करून टाकणारी परिस्थिती हजारो वर्षे टिकली तर जास्तीत जास्त कारकुनी करून पोटे भरणारे लोक होतील. या पलीकडे दुसरे कायहोणार? या कारकुनाचे रक्षण करावयास मोठा कारकून पाहिजे.
लंगोटी लावून शिक्षण केले :मनुष्याच्या उत्साहाला काही कारण असेल तर मन !तुम्हाला मिलचे मालक माहित आहेत. ते गिरण्यावर मॅनेजर नेमतात, व त्यांच्या करवी मिलमधील काम करवून घेतात. हे मिलचे मालक कसल्या ना कसल्या व्यसनात असतात, त्यांच्या मनाचा सुसंकृत असा विकास झालेला नसतो. आपल्या मनाला उत्साह वाटावा म्हणून आपण चळवळ केली, तेव्हा कोठे शिक्षण सुरु झाले. मी लंगोटी घालून शिक्षणाला सुरुवात केली. शाळेमध्ये मला प्यावयास पाणी सुद्धा मिळाले नाही. पाण्याशिवाय शाळेत मी कितीतरी दिवस काढले !मुंबई सारख्या एकफिन्स्टन कॉलेज मध्ये देखील अशीच परिस्थिती होती. अशी परिस्थिती असेल तर दुसरी काय अवस्था निर्माण होणार? कारकुनीच निर्माण होईल !.
हे भाषण धम्मचक्र प्रवर्तन ते अनुवर्तन या पुस्तकातील घेतला आहे किंवा लिहिला आहे....
बातम्या प्रकाशित व स्वतःचे विचार प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या व्हाट्सअँप क्रमांकावर मला संपर्क साधावा....
जय भीम नमो बुध्दाय जय विदर्भ ........
Comments
Post a Comment