भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण : तर लक्षपूर्वक वाचा.
हिंदू, मुसलमान व आम्ही :
मी दिल्लीच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये असताना लॉर्ड लिनलिथगो व्हाईसरॉय होते. मी त्यांना म्हणालो, तुम्ही सर्वसामान्य खर्च तर करताच, पण मुसलमानांकरता अलिगड युनिव्हर्सिटीस तीन लाख रुपये शिक्षणाकरता खर्च करता. त्याचप्रमाणे बनारसच्या हिंदू विद्यापीठासही तुम्ही तीन लाख रुपये देता. मात्र आम्ही हिंदू नाही कि मुसलमान नाही. आमच्यासाठी काही करावयाचे म्हटले तर त्यांच्या हजारो पटीने जास्त करावयास हवे. निदान आमच्यासाठी मुसलमान इतके तरी करा. तेव्हा लिनलिथगोने सांगितले, तुम्हाला याबाबत कायलिहून आणावयाचे ते आणा !त्याप्रमाणे मी एक मेमोरॅंडम लिहिजे. ते चोपडे अजून मजजवळ आहे. युरोपियन लोक मोठे सहानुभूतीचे होते. त्यांनी माझे म्हणणे मान्य केले. पण घोडे जे पेंड खाऊ लागले ते हे पैसे कोणत्या गोष्टीवर खर्च करावयाचे त्यावर !त्यांना वाटत होते, आमच्यातील मुली शिकलेल्या नाहीत, त्यांना शिक्षण घ्यावे, त्यांची बोर्डिंग काढावीत व त्यावर पैसे खर्च करावेत. आमच्यातिल मुलिंगी शिकविले व सुशिक्षित केले तरी त्यांना वेगवेगळ्या पक्वान्नांनाचे पदार्थ करावयास घरी सामान कोठे आहे? त्यांच्या शिक्षणाचा शेवटी परिणाम काय? इतर गोष्टीवरील रक्कम सरकारने खर्च केली व शिक्षणावरील रक्कम अडवून ठेवली.
राजवाड्याच्या टोकावर बसणारी माणसे :
म्हणून एके दिवशी मी लिनलिथगोकडे गेलो, आणि या शिक्षणावरील खर्चाबाबत म्हणालो, तुम्हाला राग येणार नसेल तर एक प्रश्न विचारतो. मी एकटा 50 ग्रॅज्युएटच्या समान आहे कि नाही? ते त्यांना मान्य करावे लागले. नंतर मी पुन्हा विचारले याचे कारण काय? ते म्हणाले, "ते कारण आम्हास माहित नाही "मी म्हणालो कि माझी विद्वत्ता एवढी मोठी आहे कि मी राजवाड्याच्या टोकावर जाऊन बसू शकते. मला अशी माणसे हवी आहेत. कारण तेथून सर्वत्र टेहाळणी करता येते. आमच्या लोकांचे संरक्षण करावयाचे असेल तर अशी पारध करणारी माणसे निर्माण झाली पाहिजेत. कारकून काय करणार? त्या सरशी लिनलिथगोस माझे म्हणणे पटले. त्या वर्षी 16 विद्यार्थ्यांना विलायतेत उच्च शिक्षण घेण्यासाठी आम्हास पाठविण्यात आले. त्या 16 जणांपैकी काही मडकी जशी कच्ची, काही पक्की असतात त्याप्रमाणे काही कच्ची काही पक्की निघाली. ही गोष्ट निराली !पुढे राजगोपालाचारी यांनी ही उच्च शिक्षणाची योजना रद्द करून टाकली .
कृपया लक्ष असू द्या हा लेक किंवा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण धम्मचक्र प्रवर्तन ते अनुवर्तन या पुस्तकातून लिहिण्यात आला आहे..
पुस्तकाचे चित्र पुढील प्रमाणे :
जय भीम नमो बुध्दाय जय विदर्भ 🇪🇺🇪🇺
Comments
Post a Comment