नागपूर का निवडले?.
पुष्कळसे लोक मला असा प्रश्न करतात कि या कार्याकरिता तुम्ही नागपूर हेच शहर का ठरविले? अन्य ठिकाणी हे कार्य का केले नाही? काही लोक असे म्हणतात कि आर. एस. एस. ची (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची )मोठी पलटण नागपूर येथे असल्यामुळे त्यांच्या उरावरती म्हणून आम्ही ही सभा या शहरांत घेतली आहे. हे मुळीच खरे नाही. त्यासाठी नागपूर येथे हे कार्य घेतलेले नाही. आमचे कार्य इतके मोठे आहे कि आयुष्यातील एक एक मिनिट देखील कमी पडतो. आपले नाक खाजवून दुसऱ्या अपशकुन करण्यासाठी मजजवळ वेळ नाही.
नाग लोकांचे 'नाग -पूर '
हे ठिकाणी निवडण्याचे कारण निराळे आहे. ज्यांनी बौद्ध इतिहासाचे वाचन केले असेल त्यांना हे कळून येईल कि भारतात बौद्ध प्रसार जर कोणी केला असेल तर तो नाग लोकांनी केला. नाग लोक आर्याचे भयंकर शत्रू होते. आर्य व अनार्य यांच्या मध्ये लढाया व तुंबळ युद्ध झाली. आर्य लोकांनी नागांना जाळून टाकल्याचे दाखले पुराणात सापडतात. अगस्ती मुनीने त्यातून फक्त एक नाग मनुष्य वाचविला. त्याचेच आपण वंशज आहोत. ज्या नाग लोकांना एवढा छळ सोसावा लागला त्यांना वर येण्यास कोणीतरी महापुरुष हवा होता, त्यांना तो महापुरुष भेटला. भगवान बुद्धाचा उपदेश नाग लोकांनी सर्व भारतामध्ये पसरविला. असे आपण नाग लोक आहोत. नाग लोकांची मुख्यवस्ती नागपूर येथे व आसपास होती असे दिसते. म्हणून या शहरास 'नाग -पूर 'म्हणजे नागांचे गाव असे म्हणतात. येथून सुमारे 27 मैलावर नागार्जुनाची टेकडी आहे. नजीकच वाहणारी जी नदी आहे ती नाग नदी आहे. अर्थातच या नदीचे नाव येथे राहणाऱ्या लोकांवरून पडले आहे. नागांच्या वस्तीमध्ये वाहणारी जी नदी ती नाग नदी आहे. हे स्थळ निवडण्याचे हे मुख्यकारण आहे. नागपूर यामुळे निवडले आहे. यामध्ये कोणालाही खिजविण्याचा कोठेच प्रश्न नाही. आर . एस. एस. चे कारण माझ्या मनाला शिवलेही नाही . तसा कोणी त्याचा अर्थ करून घेऊ नये.....
(भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण. )
उर्वरित भाग 3 उद्या...
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या व्हाट्सअँप नंबर मला संपर्क करा....
Jay bhim नमो बुध्दाय.. =(jay vidarbh)
Comments
Post a Comment