दि. 15 ऑक्टोबर 1956 नागपूर दिक्षा समारंभानंतर दिलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण भाग 3.


 विरोधकांची नाहक ओरड  :

                इतर कारणावरून कदाचित विरोध वाटू शकेल. हे ठिकाणी विरोधासाठी पसंत केलेले नाही. हे आता मी सांगितलेच आहे. मी हे जे कार्य आरंभले आहे त्यासाठी माझ्यावर अनेक लोकांनी व वृत्तपत्रांनी टीका केलेली आहे  काहींची टीका कडक आहे . त्यांच्या मते मी माझ्या गरीब बिचाऱ्या अस्पृश्य लोकांना भलतीकडेच नेत आहे. आज हे अस्पृश्य आहेत ते तसेच अस्पृश्य राहतील व जे हक्क अस्पृश्यांना मिळाले आहेत ते मात्र नष्ट होती, असे सांगून आमच्यातील काही लोकांना ते बहकविता आहेत. आमच्यातील अज्ञ लोकांना पगदांडीने जा असे ते म्हणतात. आमच्यातील काही तरुण व वयोवृद्ध लोकांना कदाचित त्याचा परिणाम होत असेल. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये संशयनिर्माण झाले असतील तर त्या संशयाची निवृत्ती करणे हे आपलें कर्तव्य आहे. आणि अशा संशयाची  निवृत्ती करने म्हणजे आपल्या या चळवळीचा पाया मजबूत करणे आहे. 

केसरी मधील त्यावेळचा प्रचार=

             मागे आपण लोकांनी मांस खाऊ नये म्हणून चळवळ केली होती. त्यामुळे स्पृश्य लोकांवर मोठी गदा आल्याप्रमाणे त्यांना वाटत होते. त्यांनी जिवंत म्हशीचे दूध प्यावयाचे, आणि ती म्हैस मेल्यानंतर मात्र आम्ही मृत म्हशीला खांद्यावर घेऊन जावयाचे, हा प्रकार विचित्र नव्हे काय? आम्ही त्यांना म्हणतो कि तुमची म्हातारी मेली तर तिला आम्हाला का नेऊ देत नाही? त्यांनी मेलेली म्हैस घ्यावी तशी म्हातारीही घ्यावी. त्यावेळी कोणीतरी मनुष्य 'केसरी 'मधून पत्रव्यहार करून, अमुक अमुक गावी दर वर्षाला 50 ढोरे मारतात, त्यांच्या कातड्यांची, शिंगांची, हाडांची, मांसाची, शेपटीची, खुरांची मिळून 500रुपया इतकी किंमत होईल, व मृत मांस सोडल्यामुळे एवढ्या प्राप्तीला हे लोक मुकतील असा प्रचार त्यावेळी केसरी मधून होत असे. त्यांच्या प्रचाराला उत्तर घ्यावयाची आवश्यकता खरे म्हणजे काय होती? पण आमच्या लोकांना असे वाटे, या गोष्टीला आमचा साहेब उत्तर देत नाही, तर साहेब करतो तरी काय? 

हे 15 ऑक्टोबर 1956 नागपूर दिक्षा समारंभानंतर दिलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण आहे.... 

                                                                              

बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 ह्या व्हाट्सअँप नंबर मला संपर्क साधावा... 

(जय भीम  नमो बुध्दाय जय विदर्भ )

भाग 4.. उदयाला. 

Comments