भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण :
(मृत जनावराच्या कातड्याचे, शिंगांचे, खुरांचे उत्पन्न )
एकदा मी संगमनेरला सभेला गेलो होतो. सभा झाल्यानंतर संध्याकाळी जेवणाची व्यवस्था केली होती. त्यावेळी मजकडे एक चिठ्ठी केसरीच्या त्या बातमीदाराने पाठविली, व मला विचारले "अहो, तुम्ही तर तुमच्या लोकांना मेलेली ढोरे ओढू नका म्हणून सांगता, त्यांची हलाखी किती आहे? त्यांच्या बायकांना लुगडे चोळी नाही, त्यांना अन्न नाही, त्यांना शेतीवाडी नाही, अशी त्यांची अत्यंत बिकट परिस्थिती असून, दरवर्षी त्यांना मिळणारे कातड्यांचे, शिंगांचे, मांसाचे 500 रुपयांचे उत्पन्न फेकून द्या म्हणून सांगता, यात तुमच्या लोकांचा तोटाच नाही काय? "
(तुम्ही मेलेली ढोरे ओढा , नी घ्या उत्पन्न ):
मी (परमपूज्य डॉ. बाबासाहेब म्हणाले, तुम्हाला याचे उत्तर कोठे देऊ? ते येथे पडवीत देऊ कि सभेत देऊ? लोकांच्या समोरच सवालपट्टी झालेली बरी. मी त्या गृहस्थांना विचारले, तुमचे म्हणणे एवढे कि आणखी काही आहे? ते गृहस्थ म्हणाले, एवढेच म्हणणे आहे, व एवढ्याचेच उत्तर द्या. मी (डॉ बाबासाहेब आंबेडकर )गृहस्थास विचारले, तुम्हास मुले माणसे आहेत? त्यांनी सांगितले मला पाच मुलगे आहेत, भावालाही 5/7 मुले आहेत. मी म्हणालो तर तुमचे कुटुंबं मोठे आहे. तेव्हा तुम्ही व तुमच्या नातेवाईकांनी त्या गावची मेलेली सर्व ढोरे ओढावीत, आणि 500 रुपयांचे उत्त्पन्न घ्यावे. हा फायदा तुम्ही अवश्यघ्यावा. शिवाय दरवर्षी मी स्वतः तुम्हाला 500 रुपये वर देण्याची व्यवस्था करतो, माझ्या लोकांचे कायहोईल, त्यांना अन्न वस्त्र मिळेल कि नाही ते माझे मी पाहून घेईन. मग एवढी फायद्याची गोष्ट तुम्ही कां सोडून देता? तुम्ही कां हे करीत नाही? आम्ही हे काम केले म्हणजे फायदा होतो, आणि तुम्ही केले म्हणजे फायदा नाही? ओढा ना तुम्ही मेलेली ढोरे?
हा लेक दि. 15 ऑक्टोबर 1956 नागपूर दिक्षा समारंभानंतर दिलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण आहे....
हे भाषण धम्मचक्र प्रवर्तन ते अनुवर्तन या पुस्तकातून घेतला आहे.
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या व्हाट्सअँप नंबर वर संपर्क करा..
Comments
Post a Comment