दि. 24 नोव्हेंबर 1956 सारनाथ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले भाषण.


  Vidarbh tiger news, 

           दि. 24 नोव्हेंबर 1956 सारनाथ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले भाषण. 

     बौद्ध धर्म मानवधर्म  आहे, 

           बौद्धधर्माचा प्रारंभ पक्क्या पायावर झालेला आहे. हा धर्म मानवधर्म आहे. या धर्माशिवाय मानवाच्या कल्याणाचा दुसरा मानवाच्या कल्याणाचा दुसरा कोणताही उपयुक्त धर्म नाही. 

           आपण भारताचा प्राचीन इतिहास समजून घेतला पाहिजे. हिंदुस्थानात सर्वात प्रथम आर्य आणि नाग लोकांनी युद्ध जुंपले. आर्यांजवळ युद्धास घोडे होते. त्या बळावर त्यांनी नाग लोकांवर विजय मिळविला. हेच नाग आज हिंदू आहेत. नागांनी सर्वात प्रथम बौद्धधर्माचा स्वीकार केला. त्यांना बौद्धधर्माचा प्रसार करण्यात सफलता मिळाली परंतु या नागाचा नायनाट करण्याकरिता आर्यांनी वेळोवेळी प्रयत्न केले. याचे पुरावे महाभारतात अनेक ठिकाणी आढळून येतात. पुढे आर्यांनी ब्राम्हण धर्माला व्यापक बनविले त्यात अनेक दोष निर्माण झाले. चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा उदयहा ब्राम्हणांनीचे  केला. भगवान बुद्धाने चातुर्वर्ण्याला घोर विरोध केला. त्यांनी चातुर्वर्ण्य नष्ट करून समतेचा प्रचार केला, व याच आधारावर बौद्धधर्माची स्थापना केली. भगवान बुद्धाने ब्राह्मणांच्या यज्ञाना  अमान्य केले व त्यांना तिलांजली दिली . ब्राम्हणांनी हिंसेची प्रथा सुरु केली होती ती नष्ट करून भगवंताने अहिंसेचा प्रचार केला. 

              भगंवताने म्हटले आहे कि, बौद्धधर्म महासागराप्रमाणे आहे. यास कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही. भगवान बुद्धाने करुणेचा प्रचार करून त्या काळातील पद दलित लोकांनी मने आकर्षित केली व त्यांना योग्यमार्ग दाखविला. 

               अस्पृश्यतेचा कलंक, 

            हिंदुधर्माच्या मुळात रोग झालेला आहे . याच कारणामुळे आम्हाला वेगळा धर्म ग्रहण केला पाहिजे. माझ्या समजुतीप्रमाणे बौद्धधर्म हाच योग्यधर्म आहे. यात उच्चं नीच, श्रीमंत -गरीब जाती -पाती आदी भावना नाहीत.  

     अस्पृश्य वर्गाने कल्याण बौद्धधर्म स्वीकारल्यानेच  होण्याची शक्यता आहे. हिंदुसमाजात असलेली असमानता, भेदाभेद, अन्याय व कुप्रथा बौद्धधर्म स्वीकार केल्याने दूर होऊ शकतात. 

           भारतातील अस्पृश्यांनी बौद्धधर्म स्वीकारल्यावर बर्मा, चीन, जपान, लंका आदी सर्व बौद्ध देशाची सहानुभूती आमच्या करून दशेवर होईल व आम्ही नेहमीकरिता हिंदुधर्माच्या जाचातून मुक्त होऊ शकू. वरील देशांनी आमच्या वर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध का आवाज उठविता नाही. याचे कारण म्हणजे त्यांचा समज होता कि हिंदूंचे घरगुती भांडण आहे. जर बौद्धधर्म स्वीकार केल्यानंतरही हिंदू लोक आम्हाला समता, स्वतंत्रता आणि बंधुत्वापासून दूर ठेवतील तर आम्ही वरील बौद्धराष्ट्राच्या सहयोगाने ते मिळविल्याशिवाय राहणार नाही. 

           हिंदुधर्माच्या कपाळावर अस्पृश्यता हा एक भयंकर कलंक लागला आहे. याचमुळे हिंदुजातीच्या हृदयातील दुष्टता दिसून येते. अस्पृश्य पवित्र व शुद्ध होऊन देवदर्शनासाठी जातात तरी त्यांच्यासाठी मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. शिवाशिवी, भेदाभेद, जातपात यांना समूह नष्ट करणे हे सवर्ण हिंदूंचे कर्तव्य आहे. आम्ही त्यांचा मुर्दा आपल्या खांद्यावर का वाहावा. 

हे भाषण धम्मचक्र प्रवर्तन ते अनुवर्तन या पुस्तकातून घेतला आहे... 

पुस्तकाचे चित्र पुढील प्रमाणे, 




अश्या अनेक बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या व्हाट्सअँप नंबर वर संपर्क करा. 

*******************************************

जय भिम नमो बुध्दाय जय विदर्भ.......... 


Comments