तंत्रनिकेतन प्रवेशाची तारीख आता 5 डिसेंबर पर्यंत वाढविण्यात आले. Dte date.


 Vidarbh tiger news, 

       नागपूर, 

        न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीमुळे रखडलेल्या तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी तंत्रनिकेतन संचालनालयाने नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार आता 5 डिसेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. राज्यातील 1 लाख 17 हजार जागांसाठी 30 सप्टेंबर पर्यंत 97 हजारांवर नोंदणी करण्यात आली होती. 

(5 डिसेम्बरला c. E. T. चा निकाल, 

  राज्य c. e. t सेलने ऑक्टोबरमध्ये घेतलेल्या एमएचसीईटी परीक्षेचा निकाल 5 डिसेंबरला जाहीर होणार आहे. यानंतर अभियांत्रिकी औषधनिर्माण शास्त्र या पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु होईल. कोरोना संसर्गामुळे यंदा परीक्षा आधीच सहा महिने उशिरा सुरु झाली होती नागपूर विभागातील 53 हजार 504 विद्यार्थ्यांना हि परीक्षा दिली. यात 27 हजार 183 विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र गणित आणि 26 हजार 321 विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र गटातून परीक्षा दिली )

    राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता तंत्रशिक्षण संचालनालयाने तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना घरून अर्ज  भरण्याची मुभा दिली. विशेष म्हणजे यावर्षी दहावीचा निकालात 26 टक्क्यांनी वाढ झाली. त्यानुसार आतापर्यंत 97 हजार विद्यार्थ्यांपैकी 73 हजारावर विद्यार्थ्यांनी अर्जनिश्चिती केली. मात्र मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर प्रवेश प्रक्रिया खोळंबली होती. आता राज्य सरकारने. मराठा समाजाला खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याने प्रवेशप्रक्रिया पुन्हा सुरु झाली आहे. त्यानुसार तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रवेशासाठी नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार 5 डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी नोंदणी करता येणार आहे. 12 डिसेंबर ला प्रवेशासाठी अंतिम यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. 

(40, 45 टक्क्यांवर प्रवेश.................. 

राज्यात तंत्रनिकेतन, औषधनिर्माण पदविकांना इतर मागासवर्गीय आणि विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता 40 टक्के तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 45 टक्क्यांवर प्रवेश मिळणार आहे. याआधी हि अट 45 ते 50 टक्के अशी होती. मात्र अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा यासाठी गुणवत्तेला बगल देत. प्रवेशसाठीची टक्केवारी कमी करण्यात आली आहे. 

*******************************************

अशा अनेक बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या नंबर वर संपर्क करा. 


Comments