जळगाव येथील विशाखा बुद्धविहारात धम्मप्रबोधन व समारोपिय कार्यक्रम संपन्न.


 Vidarbh tiger news:

जळगाव येथील विशाखा बुद्धविहारात धम्मप्रबोधन व समारोपिय कार्यक्रम संपन्न.


जळगाव ( ता- आर्वी ) येथील विशाखा बुद्धविहारमध्ये वर्षावास काळामध्ये बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठण करण्यात आले.

या समरोपीय कार्यक्रम निमित्त्याने धम्म प्रबोधन व परीत्त सुत्त देशनां झाली. 

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक सुरेश भीवगडे होते. तर प्रमुख अतिथी रमेश तायवाडे, सचिन मनवरे, भीम टायगर सेनेचे सूरज मेहरे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी सुरेश भीवगडे यांनी धम्ममार्गदर्शन केले.

या वर्षावास काळात ग्रंथवाचन कु पल्लवी अरुणराव वैद्य हिने केले 

तर तिला साथ देत जयघोष कु राणी काशीराव तायवाडे, अम्रूता तायवाडे हिने केला.

या वर्षावास काळात अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या यात वक्रूत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा व चित्रकला व चित्र रंगवा स्पर्धा यात  

रोहित तायवाडे, सम्बोधि पाचोडे, देवाँशु तायवाडे, पियुष तायवाडे, रिया पाचोडे, अनुश्री पाचोडे, टीना भालचक्र, अम्रूता तायवाडे राणी तायवाडे, आरू दहाट , अंशू तायवाडे, निकुँज गजभिये यांनी सहभाग घेतला.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी

.सावित्रीबाई फुले महीला मंडळ, सुजाता महिला मंडळ, आम्रपाली महीला मंडळ, प्रेरणा महीला मंडळ व जळगाव येथील युवक मित्रांनी सहयोग दिला

याप्रसंगी ग्रंथवाचक पल्लवी अरुण वैद्य यांचा नंदाबाई पाचोडे, चंद्रभागाबाई तायवाडे, मणकर्णाबाई पाचोडे व सर्व उपासक उपासीका यांच्या वतीने भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला

बुद्ध-भीमगीत सादर करण्यात आली. या कार्यक्रमाला मनोगत सुशीला पाचोडे, उमा सोनोने आदी व्यक्त केले. 

प्रास्ताविक उमा सोनोने 

आभार ज्योती तायवाडे केले. 

याप्रसंगी बुद्धविहार सजावट करण्यात आली.

**************************************#*** 

अशा अनेक बातम्या प्रकाशित करण्यासाठी ९५६१७५०४२३ या whatsapp नंबर वर मला संपर्क साधा...

******************************************जय भीम नमो बुद्धाय जय विदर्भ...

Comments