दि. 15 नोव्हेंबर 1956 काठमांडू जागतिक बौद्ध धम्म परिषदेत दिलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण भाग 16
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण. :
बोधी वृक्षाच्या मुळांना पाणी घातल्यास तो वाढेल :.
भारताचे माजी कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सौ. सविता आंबेडकर दिल्लीहून आज दिनांक 13 नोव्हेंबर 1956 रोजी दुपारी काठमांडू येथे जगातील बौद्ध धर्मीय लोकांच्या चौथ्या जागतिक परिषदेत भाग घेण्यासाठी आले. काठमांडू विमानतळावर उभयतांचे भव्यस्वागत करण्यात आले. नेपाळ सरकारतर्फे चीफ ऑफ प्रोटोकॉल, भिक्षु आनंद कौशल्यवान, विविध संस्थाचे प्रतिनिधी, स्वयंसेवक तसेच स्त्री -पुरुषांचा मोठा जमाव त्यांच्या स्वागताकरिता हजर होता. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर पती -पत्नी विमानातून खाली उतरताच "आंबेडकर जिंदाबाद "अशा गगनभेदी घोषणांनी तेथील वातावरण दुमदुमून गेले होते. तशाच घोषणा करीत त्यांना मिरवणुकीने नेपाळ सरकारच्या " सीतल महालात "पोहोचविण्यात आले. नेपाळ सरकारचे खास पाहुणे म्हणून ते तेथे राहाणार आहेत. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून त्यांना नेपाळी हवामान चांगलेच मानवले असे दिसते. काठमांडूतील अस्पृश्य समाजातील प्रमुख कार्यरकाकर्त्यांनी तसेच. महिला संघटनेचा मुख्यांनी आज रात्री परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट नेपाळातील अस्पृश्यांच्या परिस्थितीची त्यांना माहिती सांगितली.
जगातील बौद्ध धर्मीय लोकांची चौथी जागतिक परिषद दि 15 नोव्हेम्बरपासून सुरु होत आहे. या परिषदेस हजर राहण्यासाठी जगातील निरनिराळ्या देशातून बौद्ध भिक्खू, भिक्खुणी, प्रतिनिधी खास आमंत्रणावरून बोलविलेल्या प्रमुख व्यक्ती, ऑबझर्व्हर्स इत्यादी मिळून 625 लोकांना आमंत्रणे पाठविण्यात आली आहेत. ही परिषद धर्मोदय सभा, काठमांडू हिच्या वतीने घेण्यात आली असून तिचे अध्यक्ष, महाथेरो अमृतानंद आहेत. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर पती -पत्नीला बौद्ध धर्माची धर्मदीक्षा नागपूरला देणारे कुशीनगरचे 83 वर्षाचे महाथेरो भिक्खू चंद्रमणी आले असून त्यांच्या तिसऱ्या तुकडीत पाच लोक होते. तिचे नेतृत्व भिक्खू चंद्रमणी यांनीच केले होते. भिक्खू चंद्रमणी शिवायभारतातून आलेल्या भिक्खू वर्ध्याचे (नागपूर )भिक्खू भदंत आनंद कौशल्यवान, अगरतला (त्रिपुरा, कलकत्ता )वेणुवन विहाराचे भिक्खू आर्य मित्रही, आज विमानाने काठमांडू दाखल झालेले आहेत...
उर्वरित भाग उद्या .
हे भाषण धम्मचक्र प्रवर्तन ते अनुवर्तन या पुस्तकातून लिहिला आहे...
पुस्तकाचे चित्र पुढील प्रमाणे
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या नंबर मला संपर्क करा ....
जय भीम नमो बुध्दाय जय विदर्भ ...............
Comments
Post a Comment