Vidarbh tiger news,
वृत्त मुंबई,
लोकडाऊनच्या काळात आकारलेल्या वाढीव बिलात सवलत दिली जाणार नाही. अशी भूमिका ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी घेतली असली तरी या बाबत राज्य सरकार पुनर्विचार करणार असल्याचे संकेत गुरुवारी मिळाले. ऊर्जा मंत्राच्या भूमिकेत तीव्र पडसाद उमटल्यानंतर या सवलती बाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली.
विश्वसनीय सूत्रांनी सांगितले कि, लोकांच्या भावना तीव्र आहेत आणि सवलती देण्याबाबत फेरविचार झाला पाहिजे अशी मागणी काही मंत्र्यांनी बैठकीत केली. त्यावर याविषयी राऊत यांच्यासोबत स्वतंत्रपणे बैठक घेऊ असेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. विरोध कांच्या हल्ल्यानंतर सरकार नरमाईचे धोरण घेणार, असे दिसते.
राऊत यांनी गुरुवारी अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि लोकडाऊन काळातील 3 महिन्यांच्या वीज बिलात सवलती देण्यासाठी ऊर्जा विभागाने दिलेल्या निधीचा प्रस्तावावर विचार करण्याची मागणी त्यांनी केली
मंत्रिमंडळ बैठकीत मूळ सचिव संजय कुमार यांनी महाविकास आघाडी सरकारने गेल्या वर्षभरात घेतलेले निर्णय आणि त्यांनी अंबलबजावणी यासंदर्भात सादरीकरण केले.
News by vtn, search news papar...
अशा अनेक बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या व्हाट्सअँप नंबर वर संपर्क करा..
Comments
Post a Comment