सोमवारी शाळा होणार सुरु ;पण पालकांत भीती कायमच.


  Vidarbh tiger news, 

          सोमवारी शाळा होणार सुरु;पण पालकांत भीती कायमच, 

जिल्यात तयारी पूर्ण ;नववी ते बारावीच्या 70 हजार विद्यार्थ्यांना शिकविणार 2, 200 शिक्षक,  

देउरवाड़ा /आर्वी, 

           शासनाच्या निर्देशाप्रमाणे नववी ते बारावीचे वर्ग सुरु होणार आहेत. याबाबत शिक्षण विभाग सर्व शाळा व शिक्षण संस्था या अलर्ट झाल्या आहेत. सध्या वर्गखोल्या स्वच्छ करण्यासह निर्जंतुक केल्या जात आहेत. याच वर्गखोल्यांमध्ये जिल्यातील नववी ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या सुमारे 70 हजार विद्यार्थ्यांना 358 शाळांमधील 2 हजार 200 शिक्षक शिकविणार आहेत असे असले तरी सध्या पालकांकडून संमतीपत्र भरून घेतले जात आहे. 

       कोरोनायनातही शिक्षणाची गाडी रुळावर यावी यासाठी सध्या जिल्याचा शिक्षण विभाग सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. वेळप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिर्यांशी तसेच पालकांशीही संवाद साधला जात आहे. असे असले तरी शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित करून शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक  व पालकांच्या खांद्यावर सर्व जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे सध्या पालकांमध्येही आपल्या पाल्याला शाळेत पाठवायचे कि नाही याबाबत संभ्रम आहे. 

     विद्यार्थ्याला कोविड चा संसर्ग झाल्यास त्यांची जबाबदारी कुणाची असा प्रश्नही सध्या पालकांकडून उपस्थित केला जात आहे. तर कोरोना संकट मोठे असल्याने सर्व शिक्षकांना कॉवीड चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. शाळा सुरु झाल्यावर वर्ग खोल्यांमध्ये सामाजिक अंतराचे पालन आणि मास्कचा वापर करावा लागणार आहे. शिवाय विशिष्ट बैठक व्यवस्थाही वर्गखोल्यांमध्ये राहणार असल्याचे सांगण्यात आले. 

इतिहास, भूगोल, संस्कृत अर्थशात्र विषयांचे धडे दिले जाणार ONLINE. 

इंग्रजी, विज्ञान, गणित, मराठी आणि हिंदी विषयांसाठी जावे लागणार शाळेतील वर्गात. 

           -the रिपोर्ट by लोकमत news paper.. 



अश्या अनेक बातम्या प्रकशित करण्यासाठी 9561750423 या व्हाट्सअँप नंबर संपर्क करा. 


Comments