Vidarbh tiger news,
नागपूर,
विदर्भात आठवड्यातील शेवटचे दिवस पावसाचे
नागपूर सह पूर्व विदर्भात पावसाची शक्यता ;वेधशाळेने दिला इशारा.
सविस्तर वृत्त,
वातावरणातील बदलामुळे विदर्भात या आठवड्याच्या शेवटी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागपूरसह पूर्व विदर्भातील जवळपास सर्वच जिल्यात हलका स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे.
वेधशाळेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार नागपूर जिल्ह्यात 26 तारखेला काही ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यातील वातावरणाबद्दलही अशीच शक्यता वर्तविण्यात आली आहे. परंतु चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यांमध्ये 25 आणि 26 नोव्हेंबर या दोन तारखांना हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. अन्य ठिकाणी मात्र वातावरण कोरडे राहणार असून कसलाही इशारा वेधशाळेने दिलेला नाही. मागील तीन दिवसापूर्वी विदर्भात काही ठिकाणी पाऊस झाला होता. यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. शेतामध्ये कापूस, तूर हि पिके उभी आहेत. मात्र पावसाळे कापसाचे बॉंड काळे पडत असल्याने प्रतवारी घसरण्याचा धोका आहे. तसेच वेचणीला आलेला कापूस पावसात सापडल्याने नुकसान झाले आहे.
अशीच परिस्थिती पुढील आठवड्यात राहिल्यास कापसाचे मोठे नुकसान होऊ शकते. ढगाळ वातावरणामुळे तूरीचेही नुकसान होत आहे. या वातावरणात तुरीवर अळ्यांचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणावर होतो. त्यामुळे त्यांचे नियंत्रण करण्याचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. ऐन हंगामात पावसाचे वातावरण असेच राहिल्यास उत्पादनात घट होऊन त्याचा परिणाम भाववाढीवर होण्याची शक्यता अधिक आहे.
******************************************
अश्या अनेक बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या नंबर संपर्क करा.
**************-***************************
Comments
Post a Comment